पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना पत्नीचा मृत्यू, दोघांना एकाच चितेवर अग्नी; सोलापुरातील घटना

मुंबई तक

Solapur News : पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना पत्नीचा मृत्यू, दोघांना एकाच चितेवर अग्नी; सोलापुरातील घटना

ADVERTISEMENT

 Solapur News
Solapur News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना पत्नीचा मृत्यू

point

दोघांना एकाच चितेवर अग्नी; सोलापुरातील घटना

Solapur News ,भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे पती-पत्नीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे दोघांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. हे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून अनेकांना शौक अनावर झाला. किसन रामा हेगडे (वय ७०) यांचे शुक्रवारी दुपारी ३ वाजता निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, त्यांचा भाऊ बाहेरगावी असल्याने ते येण्याची वाट पाहत होते तर दुसरीकडे अंत्यसंस्काराची तयारीही सुरू होती. परंतु रात्री ८:४५ वाजता पत्नी भामाबाई किसन हेगडे (वय ६०) यांचे निधन झाले. एकाच वेळी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. गावावर शोककळा पसरली. शनिवारी सकाळी ९ वाजता त्या दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

दोघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावाावर शोककळा 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अल्पशा आजाराने एका दिवसात दोघांचेही निधन झाल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोघांचं निधन झाल्यानंतर त्यांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आलाय.

हेही वाचा : 'तो' रिपोर्ट येण्याआधी अजित पवारांनी अचानक का घेतली अमित शाहांची थेट दिल्लीत भेट?

किसन रामा हेगडे (वय 70) यांचे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांचा मृत्यू अचानक झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र, किसन हेगडे यांच्या भावाला बाहेरगावाहून यायचे असल्याने अंत्यसंस्कार रात्री उशिरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंबिय वाट पाहत असतानाच सर्वांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत होतं. दरम्यान, रात्री सुमारे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किसन हेगडे यांच्या पत्नी भामाबाई किसन हेगडे (वय 60) यांचेही निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पतीच्या मृत्यूच्या वेदनेत असतानाच भामाबाई यांनीही अखेरचा श्वास घेतल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एका दिवसात दोघांचेही निधन झाल्याची बातमी गावभर पसरताच लोकांना हा प्रसंग पचवणे कठीण झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp