नितीन राऊतांचं कौतुक करणारे मुख्यमंत्री, राठोडांवर कारवाई करतील?
महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना रूग्ण वाढत असल्याने त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा रद्द केला. या सोहळ्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं. मात्र कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी हा सोहळा रद्द केला. या गोष्टीचा विशेष उल्लेख करत नितीन राऊत यांनी जी सामाजिक जाणीव दाखवली तशीच सामाजिक जाणीव सगळ्या मंत्र्यांनी, जनतेने […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना रूग्ण वाढत असल्याने त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा रद्द केला. या सोहळ्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं. मात्र कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी हा सोहळा रद्द केला. या गोष्टीचा विशेष उल्लेख करत नितीन राऊत यांनी जी सामाजिक जाणीव दाखवली तशीच सामाजिक जाणीव सगळ्या मंत्र्यांनी, जनतेने दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्राशी जो संवाद साधला त्यामध्ये केलं. अशात आज वनमंत्री आणि शिवसेनेचे नेत संजय राठोड हे पोहरादेवी या ठिकाणी गेले असताना कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला. आता प्रश्न हा निर्माण होतो आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करतील का?
ही बातमी वाचलीत का? मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या मंत्र्याचं CM ठाकरेंकडून कौतुक
नेमकं काय घडलं आज?
पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली. त्यानंतर उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. त्यानंतर दोन दिवसांनी १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. यातला एक आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप भाजपने केला आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. तसंच संजय राठोड नॉट रिचेबल का आहेत असाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज संजय राठोड हे माध्यमांसमोर आले. त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपल्याला नाहक बदनाम केलं जातं आहे असं सांगितलं तसंच या प्रकरणावरून माझी आणि माझ्या समाजाची बदनामी थांबवा असंही आवाहन केलं. संजय राठोड हे पोहरादेवी या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते तिथे हजर होते. कोरोनाच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं.