WTC Final: पाचव्या दिवशी टीम इंडियाचं मॅचमध्ये कमबॅक, रिजर्व डे ठरवणार चॅम्पियन कोण

WTC Final Day 5 Highlights: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) फायनल मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने मॅचमध्ये कमबॅक केलं आहे.
WTC Final: पाचव्या दिवशी टीम इंडियाचं मॅचमध्ये कमबॅक, रिजर्व डे ठरवणार चॅम्पियन कोण
WTC Final(फोटो सौजन्य - PTI)

साउथम्पटन: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC)अंतिम मॅचमधील 5 दिवसांचा खेळ संपला आहे. आता ही टेस्ट मॅच कोण जिंकणार याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण ही मॅच आता रिजर्व डेमध्ये खेळविण्यात येणार आहे. यावेळी जर ही मॅच ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

या मॅचचा निकाल आज (23 जून) अर्थात रिजर्व डेला होणार आहे. या मॅचच्या पहिल्या आणि चौथे दिवसाचा खेळ हा पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन कोण होणार हे आता सहाव्या दिवशी समजणार आहे.

WTC Final
WTC Final : पावसाच्या खेळखंडोब्यानंतर केविन पिटरसन म्हणतो, महत्वाचे सामने इंग्लंडमध्ये खेळवूच नका !

पाचव्या दिवसाअखेर टीम इंडियाने दुसर्‍या इनिंगमध्ये 30 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 64 रन्स केल्या आहे. कॅप्टन विराट कोहली (8), तर चेतेश्वर पुजारा (12) धावांवर खेळत आहेत. दरम्यान दोन्ही सलामीवीर शुभमन गिल (8) आणि रोहित शमा (30) यांना टीम साऊथीने आऊट केले.

सध्या टीम इंडियाकडे 32 धावांची आघाडी आहे. सहाव्या दिवशी, भारत वेगाने रन्स करण्याचा प्रयत्न करेल आणि सुरक्षित टार्गेट देऊन किवी संघाला ऑलआऊट करण्याचा प्रयत्न करेल.

WTC Final
WTC Final : Roof Stadium ते Brumbrella, पावसामुळे होणारा क्रिकेटचा खेळखंडोबा टाळता येणं शक्य

तत्पूर्वी, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांनी न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये शानदार बोलिंग केली. परंतु कर्णधार केन विल्यमसनचा संयम आणि टीम साऊथीच्या आक्रमणानंतर न्यूझीलंडने भारतावर पहिल्या डावात काही रन्सची आघाडी घेतली होती.

दरम्यान यावेळी शमीने 76 रन्स देऊन 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्मानेही 48 रन्स 3 विकेट घेतल्या. याशिवाय स्पीनर रविचंद्रन अश्विन याने 2 विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेतली. पण टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याला एकही विकेट मिळवता आली नाही.

WTC Final
WTC Final : चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, Ind vs NZ सामना अनिर्णित अवस्थेकडे

पाचव्या दिवसाच्या पहिला सेशनवर भारताचा दबदबा पाहायला मिळाला. कारण यावेळी भारताने फक्त 34 रन्स देऊन 3 विकेट घेतले होते. टीम इंडियाकडून इशांत शर्मा आणि मोहम्मद शम्मी यांनी टिच्चून बोलिंग केली. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या इनिंगमध्ये फार मोठी मजल मारता आली नाही.

यावेळी शम्मीने आपल्या स्विंगने किवी बॅट्समनना अक्षरश: हैराण केलं. तर इशांत शर्माने देखील जबरदस्त बोलिंगचा नजराणा पेश केला. यामुळे सुरुवातीला या मॅचमध्ये काहीसा वरचढ वाटणारा न्यूझीलंडचा संघ नंतर मात्र बॅकफूटवर गेला.

Related Stories

No stories found.