परराज्यातून विक्रीसाठी आलेला ५० लाखांचा गांजा जप्त, पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांची कारवाई
पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस गावाजवळ गांजाची तस्करी करणारी एक टोळीच यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी ५० लाखांचा गांजा जप्त केला आहे. दौंड तालुक्याच्या पाटस गावात रविवारी मध्यरात्री पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर महामार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याला मिळाली होती. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एक मालवाहतूक […]
ADVERTISEMENT

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस गावाजवळ गांजाची तस्करी करणारी एक टोळीच यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी ५० लाखांचा गांजा जप्त केला आहे. दौंड तालुक्याच्या पाटस गावात रविवारी मध्यरात्री पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर महामार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याला मिळाली होती. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एक मालवाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये ५० लाख किमतीचा गांजा सापडून आला.
NCB चे अधिकारी असल्याचं भासवत खंडणीसाठी दबाव, भोजपूरी अभिनेत्रीची आत्महत्या; दोन आरोपी अटकेत
यावेळी पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या १० जणांच्या टोळीला अटक केली आहे. यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गांजा परराज्यातून विक्रीसाठी पुणे जिल्ह्यातील काही दुकानांत आणि मुंबईत विक्रीसाठी आणला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










