Yogi 2.0 : योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा घेणार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी चार वाजता इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी चार वाजता इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या पर्वाला आज सुरूवात होणार आहे. गुरूवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण योगी आदित्यनाथ यांनी मायावती, मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांनाही दिलं आहे. आज योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत साधारण 48 मंत्री शपथ घेऊ शकतात. नव्या कॅबिनेटमध्ये ७ ते ८ महिलांचाही समावेश असू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तूर्तास कोणत्याही मंत्र्याचं नाव समोर आलेलं नाही. मात्र जुन्या मंत्रिमंडळातले काही चेहरे आणि काही तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असं बोललं जातं आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला कुणाकुणाला निमंत्रण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शाह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा
केंद्र सरकारचे मंत्री
भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी
प्रसिद्ध उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित केलं आहे
एवढेच नाही तर या शपथविधी सोहळ्यात देशातील नामवंत उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांशिवाय यावेळी भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनाही या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.