Uday Samant म्हणतात मविआचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आहेत असा दावा केला होता. त्यांच्यावर नाना पटोलेंनी टीकाही केली. एकीकडे या सगळ्या गोष्टी घडत असतानाच महाविकास आघाडीचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी? […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आहेत असा दावा केला होता. त्यांच्यावर नाना पटोलेंनी टीकाही केली. एकीकडे या सगळ्या गोष्टी घडत असतानाच महाविकास आघाडीचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.
काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर खोक्यांचे आरोप झाले, त्यानंतर उद्योग खात्याला टार्गेट करुन बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गेलेले उद्योग मागील सरकारच्या काळातच गेल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं. त्यानंतर आता मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्याडे १७० आमदार असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे शिंदे सरकार स्थिर आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
जनतेत चुकीचा मतप्रवाह निर्माण करण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र
तसेच जनतेमध्ये एक वेगळा प्रवाह निर्माण करायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने सरकारवर टीका करण्याचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे. मात्र त्यातून काही हाती लागत नाही हे लक्षात आलं, आता तर राज्यातील उद्योग कोणामुळे परराज्यात गेले हे उघड झाल्याने त्याचे अपयश झाकण्यासाठी मध्यावधी निवडणुकांची हवा केली जात असल्याचा आरोप देखील उदय सामंत यांनी यावेळी केला.