Nashik MLC 2023 : काँग्रेसचा ‘हात’ सुटल्यानंतरही सत्यजीत तांबेंची ताकद वाढली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

2 teachers organization support Satyjeet Tambe :

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची ताकद वाढली आहे. तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं. तसंच त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचीही सुत्रांची माहिती आहे. मात्र यानंतरही तांबे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे. (2 teachers organization support Satyajeet Tambe for Vidhan Parishad Election)

सत्यजीत तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजीत तांबे यांना दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकवावे असे आवाहन ‘मस्ट’ या संघटनेने केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, उच्चशिक्षित सत्यजीत तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण पदवीधरांना दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी मनिष गावंडे, महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून सत्यजीत तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी आणि हितचिंतक, शिक्षक हे सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील असे आश्वासनही गावंडे यांनी दिलं.

सत्यजीत तांबेंना भाजपचाही पाठिंबा?

दरम्यान, तांबे यांना भाजपचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरुन संकेत मिळत आहेत. राजकीय वर्तुळात नाशिक पदवीधर विधानपरिषदेसाठी मागील काही दिवसांपासून भाजप अहमदनगरच्या एका बड्या राजकीय घराण्यातील युवा नेत्याला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. हे युवा नेते सत्यजीत तांबेंच आहेत का? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

ADVERTISEMENT

सध्या तरी भाजपच्या कोणत्याच नेत्याने तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत भाष्य केलेलं नाही. मदत मागितली तर विचार करु, असं म्हणतं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेफ उत्तर दिलं. तर योग्यवेळी सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील असं म्हणतं फडणवीस यांनीही याबाबत बोलण्याचं टाळलं. याशिवाय अद्याप आमचं काही ठरलेलं नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT