Cabinet Meeting Decision: शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय

रोहित गोळे

Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय हे राज्य सरकारने घेतले आहेत. ज्यापैकी लेक लाडकी योजना हा महत्त्वाचा निर्णय असून याशिवाय इतरही महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

7 big decisions in shinde fadnavis cabinet meeting manatralaya lek ladki yojana
7 big decisions in shinde fadnavis cabinet meeting manatralaya lek ladki yojana
social share
google news

Cabinet Meeting 7 big decisions: मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) आज (10 ऑक्टोबर) मंत्रालयात पार पडली. ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट मंत्रीही हजर होते. याच बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (7 big decisions in shinde fadnavis cabinet meeting manatralaya lek ladki yojana)

यावेळी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण, सांगली-अहमदनगरमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारणे यासह एकूण 7 निर्णय घेण्यात आले.

पाहा मंत्रिमंडळ निर्णय सविस्तरपणे:

1. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, मुलींना करणार लखपती (महिला व बालविकास विभाग)

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.
या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp