अब्दुल सत्तारांनी राज्यसभेला आम्हाला खूप मदत केली; भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचे तीन उमेदवार निवडूण आले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे तीन उमेदवार भाजपचे निवडून आले. त्यानंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या, आमदारांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार संतोष दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आणि त्यांनी शिवसेनेचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे राज्यसभेला मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही कराली असे संतोष दानवे म्हणाले आहेत. आता भाजपच्या एका आमदराने शिवसेनेच्या बड्या नेत्याने आम्हाला मदत केली म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाले आहे.

अब्दुल सत्तारांनी संतोष दानवेंचे मत फोडण्याचा दिलता ‘शब्द’

दरम्यान अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकी अगोदर याच संतोष दानवेंबद्दल एक वक्तव्य केले होते. अब्दुल सत्तार म्हणाले होते की संतोष दानवे यांचे मत आमच्या घरातील आहे, ते मी फोडणारच. आमचं सर्व बोलणं झाले आहे त्यामुळे दानवे शिवसेनेला मतदान करतील असेही सत्तार म्हणाले होते. पंरतु आता संतोष दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नक्की काय झाले असेल असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

”पराभव झाल्यामुळे बावचळलेत, पिसाटलेट”

राज्यसभेचा निकाल हाती आल्यापासून अनेक राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. नवनिर्वाचीत खासदारांच्या सत्कार समारंभात बोलताना फडणवीस म्हणाले की पराभव झाल्यामुळे बावचळलेत, पिसाटलेट काहीची तोंडं पडली आहेत. मुख्यमंत्र्यांनी अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. विधान परिषदेही अशाच प्रकारे विजय मिळवू. यावेळी त्यांनी लढाई अजून संपलेली नाही म्हणत कार्यकर्त्यांना असाच उत्साह ठेवण्याचे आवाहन केले आहे.

”शिवसेना अपक्ष आमदारांचे काहीच करु शकत नाही”

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की अपक्ष आमदारांना ते काहीच करु शकत नाहीत कारण त्यांना सरकार टिकवायचं आहे. जर ते अपक्ष आमदारांना काही बोलले तर ते सरकारमधून बाहेर पडतीलच परंतु आमच्यावर प्रेम करणारे लोकही सरकारमधून बाहेर पडतील. कालचा विजय फडणवीसांनी भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला आहे. जिंकलेल्यांनी उन्माद करायचा नसतो, आनंद साजरा करायचा असतो असेही फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT