फ्लोअर टेस्टला गैरहजर राहणं काँग्रेस आमदारांना भोवणार?, हायकमांड कडक कारवाईच्या तयारीत

Congress MLAs महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसात मोठी उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले.
Ashok Chavan
Ashok Chavan

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसात मोठी उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले. यादरम्यान दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवड झाली. फ्लोअर टेस्टही झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे जवळपास २० आमदार फ्लोअर टेस्टसाठी गैरहजर राहिल्याचे समोर आले होते.

यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेसचे जवळपास ११ आमदार मतदानाला अनुपस्थीत होते. आणि याचीच दखल आता पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. बहुमत चाचणीला गैरहजर राहिल्यामुळे काँग्रेस हायकमांड पक्षशिस्त मोडल्य़ामुळे ११ आमदारांवर कारवाई करण्यावर ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सोमवरी विधानसभेत बहुमत चाचणी होती त्यावेळी काँग्रेसचे ११ आमदार उशीरा पोहोचल्याने किंवा काही आमदार हजर न राहिल्याने त्यांना मतदान करता आले नव्हते त्यामुळे महाविकास आघाडी १०० मतदानाचा टप्पा देखील गाठू शकली नव्हती. त्यामुळे याची दखल काँग्रेस हायकमांडने घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. काँग्रेसच्या या आमदारांनी कारणे पाठवलीही परंतु ती कारणं हायकमांडला मान्य झाली नाहीत. त्यामुळे आता आमदारांवर निलंबनाची किंवा पक्षातून हकालपट्टीची कारवाई होणार का? हे पाहावं लागणार आहे.

या ११ आमदारांवर कारवाई होणार?

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर.

काँग्रेस हायकमांडला उत्तर देताना अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी उशीर झाल्याचे कारण दिले त्यामुळे विधानभवनाचे दार बंद झाले. आमदार प्रणिती शिंदे या परदेश दौऱ्यावर आहेत तर अंतापूरकर यांनी लग्नाचे कारण दिले आहे. आता या सर्वांवर काँग्रेसचे हायकमांड काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संघटक सचिव के.सी वेणुगोपाल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत या आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे हायकमांडकडून सांगण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in