तीन राज्यातील विजयानंतर PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले ‘देशविरोधी…’

मुंबई तक

विधानसभेच्या निकालानंतर विजयी झालेल्या भाजपने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी इंडिया आघाडीला देशनविरोधी शक्ती म्हणत त्यांच्यावर टीका केली. भ्रष्टाचाराला साथ देणाऱ्यांना मतदारांनीच बाजूला केले असल्याचे सांगत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर ह्ललाबोल केला आहे.

ADVERTISEMENT

After victory in three states PM Modi attacked Congress said Don't give strength to anti-national forces
After victory in three states PM Modi attacked Congress said Don't give strength to anti-national forces
social share
google news

Narendra Modi: ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत हा आवाज तेलंगणापर्यंत गेला पाहिजे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh) भारतीय जनता पक्षाने (BJP) विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयातून भाषण करताना विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेसह इंडिया आघाडीवर (India Alliance) टीका करताना, जनतेसाठी आणलेल्या योजनांवर जे पक्ष टीका करतात त्यांना देशविरोधी म्हणत त्यांना कायमच दूर ठेवण्याचे आव्हान त्यांनी मतदारांनी केले.

सर्व मतदारांचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विजयानंतर विरोधकांवर हल्लाबोल करत मतदारांचे त्यांनी आभार मानले. ज्यांनी देशात भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिले त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचे काम मतदारांना केले आहे. त्यामुळे आता माझ्यावरची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी आजच्या भाषणात त्यांनी मतदारांचे आभार मानले.

चार जाती सगळ्यात मोठ्या

राजकारणासाठी विरोधकांनी नेहमीच स्वार्थी राजकारण केले. समाजामध्ये फूट पाडण्यासाठी ज्यांनी जातीचे आणि धर्माचे राजकारण केले त्यांना आता सत्तेपासून मतदारांनीच लांब ठेवले आहे. त्यामुळे जाती धर्मापेक्षा मला आता चार जाती महत्वाच्या वाटतात. त्या म्हणजे महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंब या चार जाती माझ्यासाठी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी जाती धर्माचे राजकारण करून दोन्ही समाजात नेहमीच फूट पाडण्याचे काम त्यांनी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Katipally Venkat Reddy : माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना पाडलं, कोण आहे ‘हा’ भाजपचा ढाण्या वाघ?

2047 मध्ये विकसित राष्ट्र

ज्या मतदारांनी जेवढ्या विश्वासाने आम्हाला विजयी करून दिले आहे. त्या मतदारांना हे मी विश्वासाने सांगू इच्छितो की, 2047 पर्यंत भारत हा विकसित राष्ट्रामध्ये त्याची गणना केली जाईल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. त्यांच्या या विश्वासावरच आगामी निवडणुकीतही आता आमचा विजय नक्की असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

हे वाचलं का?

    follow whatsapp