जितेंद्र आव्हाडांवर दुसरा गुन्हा : अजित पवार संतापले, शिंदे-फडणवीसांना म्हणाले…
जितेंद्र आव्हाडांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका मांडली. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबद्दल भाष्य केलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे […]
ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका मांडली.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबद्दल भाष्य केलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत, त्याला बगल देण्याचं काम होतंय हे महाराष्ट्राला मारक आहे”, असा दावाही अजित पवारांनी केला.
जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा : नेमकं काय घडलं, पाहा ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ