काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीबाबांसह ‘यांनी’ केल्या उमेदवारी अर्जावर सह्या
काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या शर्यतीत आता मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव आलं आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज भरला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे नाव चर्चेत नव्हतं. अशात त्यांनी अर्ज भरल्याने त्यांची एंट्री ही वाईल्ड कार्ड एंट्री मानली जाते आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मल्लिकार्जुन खरगेंनी अर्ज भरला आहे. गुरूवारी रात्री उशिरा […]
ADVERTISEMENT

काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या शर्यतीत आता मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव आलं आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज भरला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे नाव चर्चेत नव्हतं. अशात त्यांनी अर्ज भरल्याने त्यांची एंट्री ही वाईल्ड कार्ड एंट्री मानली जाते आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मल्लिकार्जुन खरगेंनी अर्ज भरला आहे. गुरूवारी रात्री उशिरा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी हा अर्ज भरला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर लढवू शकतात, सोनिया गांधी म्हणाल्या Its Your Call
काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे मैदानात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी शशी थरू यांनी राजीव गांधी यांच्या स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला. तसंच मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दिग्विजय सिंह यांनी माघार घेतल्यानंतर आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
कट्टर काँग्रेसी आहेत मल्लिकार्जुन खरगे
पुढचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा असला पाहिजे? हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला असता ते म्हणाले की अध्यक्ष कुणीही झालं तरी हरकत नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे विचार, विश्वास, धोरण आणि भारताविषयीचा दृष्टीकोन या सगळ्याचं प्रतिनिधीत्व होतं. राहुल गांधी यांनी जे सांगितलं त्या उत्तरात मल्लिकार्जुन खरगे हे एकदम फिट बसतात. कारण मल्लिकार्जुन खरगे हे कट्टर काँग्रेसी आहेत. त्यांनी अगदी कार्यकर्ता पदापासून काँग्रेसमधली कारकीर्द सुरू केली आहे. १९६९ मध्ये ते गुलबर्गा सिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.