Nitin Gadkari: १०-१५ वर्षांनी तरूण दिसत आहात असं मला अमिताभ आणि जया बच्चन म्हणाले"

नितीन गडकरींनी सांगितलं प्राणायम आणि योग यांचं महत्त्व
Amitabh and Jaya Bachchan told me that you look 10-15 years younger Says Nitin Gadkari
Amitabh and Jaya Bachchan told me that you look 10-15 years younger Says Nitin Gadkari

नियमित प्राणायाम आणि योगा केल्यामुळे माझ्या आरोग्यात भरपूर सुधारणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी माझे आरोग्य चांगले नव्हते, नंतर मी नियमित प्राणायाम सुरू केलं आणि आज त्याचे भरपूर लाभ मिळत असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला गेलो असताना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची भेट घेतली. तेव्हा दोघांनी वयापेक्षा दहा ते पंधरा वर्षे तरुण दिसता असे प्रमाणपत्र दिल्याचे गडकरी म्हणाले.

काय म्हणाले नितीन गडकरी?

आपली हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती खूप महान आहे. मात्र फक्त आपण महान म्हणून चालणार नाही. मुळात आपल्या संस्कृतीची महानता योग आणि आयुर्वेद सारख्या ज्ञानाशी जोडलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे जगात फिरतो, तिथे लोक आयुर्वेद आणि योग याबद्दल बोलतात, विचारतात. मात्र आयुर्वेदाबद्दल तेवढं ज्ञान माझ्याकडेही नाही असे गडकरी म्हणाले. आज अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत फक्त आपण आपला ज्ञान चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट करायला शिकलो पाहिजे असेही गडकरी म्हणाले.

अमिताभ बच्चन गडकरींना काय म्हणाले?

या वक्तव्यानंतर नितीन गडकरींनी अमिताभ बच्चन यांनी काय म्हटलं ते सांगितलं. नितीन गडकरी म्हणाले की दिवसांपूर्वी मुंबईत येऊन मी अमिताभ आणि जया बच्चन यांना भेटलो. या दोघांनीही माझं कौतुक केलं. तुम्ही वयापेक्षा १०-१५ वर्षे तरूण दिसता असं मला या दोघांनी सांगितलं. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की योग आणि प्राणायम याचं महत्त्व किती आहे? असंही गडकरी म्हणाले.

रोज एक तास प्राणायम करतो

मी दररोज एक तास प्राणायम करतो. त्याशिवाय माझी कामं मी करत नाही. त्याचा मला माझं आरोग्य राखण्यासाठी फायदा होतो आहे. मला एका डॉक्टरांनी प्राणायम कसं करायचं ते शिकवलं. मी त्यांना हेदेखील सांगितलं की हे तुम्ही युट्यूबवरही पोस्ट करा म्हणजे त्याचा इतरांनाही फायदा होईल. योगासनं आणि प्राणायम यातला मी तज्ज्ञ नाही. मात्र प्राणायम आणि योगासनं केल्याने आपण तंदुरूस्त राहतो हे लक्षात घेतलं पाहिजे असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in