अमोल मिटकरींचं सत्तारांबद्दल ट्विट, अजित पवारांच्या भूमिकेवरच शंका?
वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप आणि सिल्लोडमध्ये होत असलेला कृषी महोत्सव या दोन प्रकरणावरून अब्दुल सत्तारांची विरोधकांनी कोंडी केली. अब्दुल सत्तारांची ही दोन प्रकरणं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरत अजित पवारांनी थेट अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि जोपर्यंत राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आवाज उठवू असा इशाराही दिला. पण, […]
ADVERTISEMENT

वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप आणि सिल्लोडमध्ये होत असलेला कृषी महोत्सव या दोन प्रकरणावरून अब्दुल सत्तारांची विरोधकांनी कोंडी केली. अब्दुल सत्तारांची ही दोन प्रकरणं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात मांडली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरत अजित पवारांनी थेट अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि जोपर्यंत राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आवाज उठवू असा इशाराही दिला. पण, दुसरा दिवस उजाडला अन् सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी क्षीण झाली. आता याच मुद्द्यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी एक ट्विट केलं… ज्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एनआयटी भुखंड घोटाळा प्रकरणानंतर विरोधकांच्या हाती अब्दुल सत्तारांचा गायरान जमीन वाटप प्रकरण लागलं. अब्दुल सत्तार राज्य महसुल मंत्री असतानाच्या काळातील हे प्रकरण. त्यात भर टाकली सिल्लोड सांस्कृतिक महोत्सवानं. अब्दुल सत्तारांनी कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना टार्गेट दिल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात सांगितलं.
लवासा : “शरद पवारांसह कुटुंबियांविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश द्या”