बच्चू कडू आक्रमक होताच मिळालं फळ! शिंदे-फडणवीसांनी मंजूर केला ५०० कोटींचा प्रकल्प

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं कोणत्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे?
Approving the pending project in Bachchu Kadu's constituency... Govt's move to remove His displeasure
Approving the pending project in Bachchu Kadu's constituency... Govt's move to remove His displeasure

अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्प ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता. 6134 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळाला आहे. बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्पाला मान्यता. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला गेला आहे अशी चर्चा रंगली आहे.

मविआ सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. नवं सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिपदी संधी मिळेल, अशी त्यांना आशा होती. पहिल्या विस्तारात बच्चू कडू यांना संधी मिळाली नव्हती. त्यानंतर रवी राणा यांनी गुवाहाटीच्या संदर्भानं पैशांचा आरोप केल्यानं बच्चू कडू आक्रमक झाले होते. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाचा विषय राज्यभर चर्चेचा ठरला होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू एक पाऊल मागं घेतलं होतं. आता शिंदे फडणवीसांनी कडूंना रिटर्न गिफ्ट दिलं. अचलपूर सपन प्रकल्पाला ४९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

६१३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार

अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्प ४९५.२९ कोटींची सुधारीत मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ६१३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प बच्चू कडूंच्या मतदारसंघातील आहे.

क्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना . अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांमध्येही विकास कामांसाठी निधी (आदिवासी विकास विभाग)

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मान्यता. (महिला व बाल विकास विभाग

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in