राज ठाकरेंना भाजपनं पत्र लिहायला सांगितलं?; अरविंद सावंतांचं मनसे अध्यक्षांच्या मौनावर बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. उमेदवारी अर्ज दाखल झालेत आणि सर्वच उमेदवार प्रचारालाही लागलेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून निवडणूक लढवू नये अशी विनंती केलीये. राज ठाकरेंच्या याच पत्राबद्दल भूमिका मांडताना अरविंद सावंतांनी शंका उपस्थित केली आहे.

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले,”ती खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण उशीर झालाय. देर आये दुरुस्त म्हणता येईल, पण ते त्यांच्या व्यर्थीपुरतं म्हणता येईल. प्रत्यक्षात काय घडलंय? निवडणूक आयोगाकडे जेव्हा शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचा वाद घातला, तेव्हा या शिंदे गटानं सांगितलं की, धनुष्यबाणाचा गैरवापर होईल म्हणून ते चिन्ह गोठवावं. आम्हाला द्यावं. नाव गोठवावं. लढले का निवडणूक? लढताहेत का निवडणूक? खोटेपणा तिथे केला. किती खोटारडी माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येक नेत्याचं विधान खोटं असणार आणि होतं, त्याचं हे समोर दिसलेलं उदाहरण आहे.”

‘भाजपनं अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा, फडणवीसांना पत्र

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“एव्हढं करून ते थांबलेत का? ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना जे गलिच्छ राजकारण खेळलं गेलं. जो दबाव मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) टाकला. कितीही त्यांनी सांगू द्या की आमचा दबाव नव्हता. मग माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं की, दबाव नव्हता तर मंजूर करण्याचे आदेश दिले नाही? तुमचा दबाव होताच होता. दुर्दैवाने अधिकारी गुलामासारखे वागले. मुंबई महापालिकेला त्यांनी कलंक लावला. लांच्छन लावलं”, अशा शब्दात अरविंद सावंतांनी संताप व्यक्त केला.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : ‘… तेव्हा राज ठाकरे गप्प होते’; सावंतांनी उपस्थित केली शंका

“इतका छळवाद जेव्हा झाला, तेव्हा राज ठाकरे गप्प होते. आणि आता त्यांनी हे सांगितलंय. उमेदवारी अर्ज भरू झालंय. प्रचाराला सुरूवात झालीये. कदाचित लक्षात आलं असेल की पराभव होईल. त्यामुळे यांनीच (भाजप) त्यांना (राज ठाकरे) नाही ना सांगितलं की तुम्ही एक असं पत्र द्या आम्हाला. म्हणजे आम्हाला थेट माघार घेता येणार नाही, मग राज ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतली. सगळ्या पळवाटा आहेत. दुर्दैव आहे”, असं अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर म्हटलंय.

ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणूक : भाजप उमेदवार मागे घेणार? ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांनी मांडली भूमिका

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी भाजपपासून दूर राहावं; अरविंद सावंतांचा सल्ला

“राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या या सगळ्या राजकारणात स्वतःला गुंतवून घेऊ नये, असं मला वाटतं. कारण यांनी माणुसकी सोडलेली आहे. ही संविधानहीन माणसं आहेत. कोल्हापूरच्या निवडणुकीत बघा काय घडलं? संवेदनाहीन तो पक्ष आहे. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलीये, त्याला फार उशीर झालाय. ठिक आहे. संवेदना दाखवली, त्याबद्दल आभार”, असं म्हणत अरविंद सावंतांनी राज ठाकरेंना भाजपपासून दूर राहण्याचा सल्लाही दिलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT