Assembly elections 2023: काँग्रेसचे टोचले कान, भाजपला चिमटे; शिवसेनेचं UBT म्हणणं काय?
Assembly Election Results 2023 : राज्यातील नेत्यांचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार असल्याचे निरीक्षण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नोंदवले आहे.
ADVERTISEMENT

Assembly Election Results 2023 Analysis : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तीन राज्यात भाजपने मोठे यश मिळवले, तर सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसला. तेलंगणा वगळता काँग्रेसची निराशा झाली. चार राज्यातील निवडणूक निकालाबद्दल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘सामना’ अग्रलेखातू भाष्य केले आहे. भाजपच्या विजयाची कारणे सांगतानाच ठाकरे गटाने काँग्रेसचे कान टोचले आहेत. (Shiv Sena UBT On Assembly election results 2023)
चार राज्यातील निकाल : शिवसेनेने यूबीटी काय म्हटलंय…?
1) “मध्य प्रदेशची निवडणूक कोणत्याही चेहऱ्याशिवाय लढवली गेली. कैलास विजयवर्गीय, नरेंद्र तोमर, प्रल्हादसिंह पटेल अशा केंद्रीय नेत्यांना व मंत्र्यांना निवडणुकीत उतरवले गेले. शिवराजसिंह चौहान यांच्या समोर पक्षांतर्गत आव्हान उभे करण्यात आले. तरीही शिवराजमामा एका जिद्दीने निवडणुकीच्या रणात उतरले. महिलांसाठी त्यांनी अखेरच्या क्षणी ‘लाडली बहना’ योजना जाहीर केली. महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा हा फंडा कामी आला. अर्थात, आता ते पुन्हा मुख्यमंत्री होतील काय? याबाबत कोणीच भरवसा देऊ शकत नाही.”
हेही वाचा >> तेलंगणातील मतदारांचे PM मोदींनी मानले खास आभार
2) “मध्य प्रदेशात जिंकण्याची काँग्रेसला सर्वाधिक संधी होती, पण शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर कमलनाथ टिकले नाहीत. काँग्रेसची सूत्रे, तिकीट वाटप कमलनाथ यांच्या हाती होते. ‘इंडिया’ आघाडीचे नियम त्यांनी पाळले नाहीत. मध्य प्रदेशात अखिलेश यादव व त्यांच्या समाजवादी पार्टीचे बऱ्यापैकी मतदान आहे. कमलनाथ यांनी अखिलेशना टाळले व समाजवादी पार्टीने स्वतंत्र उमेदवार उभे केले. काँग्रेसचे राज्याराज्यांतील लोकप्रिय नसलेले वतनदार राहुल-प्रियांका गांधींच्या मेहनतीवर पाणी टाकत आहेत.”
3) “छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बघेल भलतेच हवेत होते. भाजप स्पर्धेतच नाही, अशा वल्गना ते करीत होते. काँग्रेस छत्तीसगडमध्ये जिंकेलच, असा डंका सगळेच पिटत होते. प्रत्यक्षात भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला छत्तीसगडने नाकारले. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी ज्या योजना राबवल्या, त्यातील अनेक योजनांचे जनक भूपेश बघेल आहेत. त्यांची पकड व लोकप्रियता चांगली असतानाही जनतेने त्यांना नाकारले.”
4) “राजस्थानात अपेक्षेप्रमाणे पाच वर्षांनी भाकरी फिरवली गेली आहे. तेथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे जादू करतील असा अंदाज होता. अशोक गेहलोत व त्यांच्या सरकारविषयी लोकांत नाराजी नव्हती तरीही पाच वर्षांनी सरकार बदलायचेच ही राजस्थानच्या मतदारांची मानसिकता आहे व त्यानुसार घडले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजप जिंकले. हे मोदींचे यश व तसा जल्लोष भाजपने सुरू केला.”