औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरेंना झाली बाळासाहेबांच्या ‘त्या’ तीन सल्ल्यांची आठवण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी म्हणजेच रविवारी सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता कायम आहे. भोंग्यांचा वाद, सरकारला दिलेला अल्टिमेटम या सगळ्या गोष्टी समोर आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा राज ठाकरेंचं भाषण ऐकून त्यांना तीन मोलाचे सल्ले दिले […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी म्हणजेच रविवारी सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता कायम आहे. भोंग्यांचा वाद, सरकारला दिलेला अल्टिमेटम या सगळ्या गोष्टी समोर आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा राज ठाकरेंचं भाषण ऐकून त्यांना तीन मोलाचे सल्ले दिले होते तो किस्सा सांगितला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
” शिवसेनेत असताना मुंबईत माझी पहिली सभा झाली. साधारण पाच मिनिटं मी बोललो असेन आणि सगळा कार्यक्रम संपला. कुणीतरी माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की माँ (मीनाताई ठाकरे) आली आहे. मी म्हटलं माँ? मोर्चाला? तर मी सगळ्या गर्दीतून गेलो तर माँ गाडीमध्ये येऊन बसली होती भाषण ऐकायला. मला पाहिल्यावर म्हणाली बस, काका (बाळासाहेब ठाकरे) वाट बघतोय. त्यावेळी दुपारचे अडीच वाजले होते. बाळासाहेबांची झोपायची वेळ, मी विचारलं काका जागा आहे का? तर ती म्हणाली हो. मग मी घरी आलो तर बाळासाहेब बसलेले होते.”