Budget Session : पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस-भास्कर जाधव भिडले, काय घडलं नेमकं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Budget Session :

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (UBT) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. भास्कर जाधव यांनी “माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही” असा आरोप करत अध्यक्षांबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसंच काय चाललं आहे? असा प्रश्न विचारला. यानंतर फडणवीसही आक्रमक झाले. “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? आम्ही हे खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण होतं. first day of the budget session conflict between Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Shiv Sena (UBT) leader Bhaskar Jadhav)

नेमकं काय घडलं?

सभागृहात चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं भाषण सुरु होतं. त्यादरम्यान, भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली. आपल्याला पॉईंट ऑफ ऑर्डर मांडू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला. यानंतर अजित पवार यांचं भाषण थांबतं फडणवीस आक्रमकपणे बोलायला उभे राहिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Shivsena : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हिप; आदेश डावलल्यास आमदारकी जाणार?

फडणवीस म्हणाले, “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही.” भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं.

ADVERTISEMENT

यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत सभागृहाची आणि अध्यक्षांची प्रतिष्ठा राखण्याबाबत भास्कर जाधव यांना सुनावलं. यानंतर भास्कर जाधव यांनी नरमाईची भूमिका घेत फडणवीस यांना प्रत्यूत्तर दिलं.

ADVERTISEMENT

Manish Sisodia CBI: डिलीट केलेल्या फाईल्स, अधिकाऱ्याचा जबाब अन् 3 शब्द!

भास्कर जाधव काय म्हणाले?

भास्कर जाधव म्हणाले, संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाचा देशामध्ये काय सन्मान आहे आणि ते राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, हे तुम्ही सांगितलं. हे अध्यक्ष महोदय आम्हाला मान्य आहे. पण माझी सूचना वजा विनंती आहे, ही सुरूवात आमच्याकडून करुन घेण्याची जबाबदारी या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्ती म्हणून आपली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, भास्करराव दम देताहेत. ठिके मागच्या वेळी मी सांगितलं की, माझा आवाज मोठा आहे. तुमचा आवाज मोठा होता, नाना पाटेकरांनी सांगितल्यामुळे बारीक केला. पण मी केवळ एवढाच छोटासा विषय ऐकून घ्या सांगत होतो.

राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने मांडायचा असतो. जे सत्ताधारी पक्षाला समर्थन करणारे पक्ष असतात, त्यातल्या एखाद्या सदस्याने उठून अनुमोदन द्यायचं असतं. हा काही हट्टाचा, विरोधाचा भाग नाही. ही बाब मी लक्षात आणून देत होतो. ते तुम्ही त्यांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT