'मविआ'च्या काळात आलेल्या प्रकल्पांची यादी द्या : भाजपचे आदित्य ठाकरेंना दुसऱ्यांदा आव्हान

३ दिवस झाले पण आदित्य ठाकरेंनी अजून यादी दिलेली नाही... : भाजपचा दावा
bjp-aditya thackeray
bjp-aditya thackerayMumbai Tak

मुंबई : बोलबच्चन आदित्य ठाकरे, तीन दिवस झाले तरी स्वतःच्या वडिलांच्या काळात आलेल्या प्रकल्पाची यादी देतच आहेत, असं म्हणतं भाजपने पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. तसंच आदित्य ठाकरे यांनी "माझ्याशी समोरासमोर चर्चेला या" या शिंदे-फडणवीस सरकारला दिलेल्या आव्हानाचीही भाजपने खिल्ली उडवली.

भाजपने आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं की, तोंडातून आवाज निघत नाही, म्हणे समोरासमोर डिबेट करण्यासाठी बसा. पगार किती, बोलतो किती? लेव्हल तरी आहे का? आज तिसरा दिवस आहे, बोलबच्चन आदित्य ठाकरे, स्वतःच्या वडिलांच्या काळात आलेल्या प्रकल्पाची यादी देतच आहेत, असं म्हणतं भाजपने दुसऱ्यांदा आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे विरुद्ध भाजप : दोन आव्हान -

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या काळात राज्यात साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आल्याचा दावा केला. त्यावर भाजपकडून आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ६ लाख कोटी गुंतवणुकीचा तपशील द्यावा, नाही तर पोगो बघण्या इतपतच वकूब असल्याचे मान्य करावे, असं आव्हान दिलं होतं.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही हे आव्हान स्वीकारत ठाकरे सरकारच्या काळात राज्यात किती उद्योग, गुंतवणूक आणली, किती रोजगार निर्माण केले याची आकडेवारी पुराव्यासहित देणार असल्याचं म्हटलं होतं. पण अद्यापही त्यांनी ते दिलं नसल्याचं म्हणतं, भाजपनं याच आव्हानाची आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा आठवण करुन देत ही यादी देण्याचं दुसऱ्यांदा आव्हान दिलं आहे.

bjp-aditya thackeray
Aditya Thackeray : 'मविआ'ने ६.५ लाख कोटींची गुंतवणूक आणली; पुरावेही देणार : आदित्य ठाकरेंचे उत्तर

समोरासमोर चर्चेला बसा :

सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, खोटं बोलण्याचं नाट्य सुरु असून हे आता संपलं पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे असं म्हटलं आहे. पण स्पर्धेबद्दल बोलायचं गेल्यास महाराष्ट्र कुठे कमी पडतोय का? याबाबत चर्चा करण्यासाठी मी त्यांना आव्हान देतो.

हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर चर्चेला यावं,” असही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपनं आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानाची खिल्ली उडवली. तोंडातून आवाज निघत नाही, म्हणे समोरासमोर डिबेट करण्यासाठी बसा. पगार किती, बोलतो किती? लेव्हल तरी आहे का? असं भाजपनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in