'नंगानाच' चालू देणार नाही : चित्रा वाघ यांनी उर्फीला ठणकावलं, चाकणकरांनाही भिडल्या!

Urfi javed controversy : उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा अन् भाजप नेत्या भिडल्या
Urfi javed controversy
Urfi javed controversy Mumbai Tak

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नसल्याचं म्हणतं वाघ यांनी उर्फी जावेदला ठणकावलं आहे. तसंच महिला आयोगानं घेतलेल्या भूमिकेववरुनही वाघ यांनी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त केला.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, मुंबईत उर्फी जावेद उघडी-नागडी फिरत आहे, याची महिला आयोगाने सुमोटो केस चालवणं गरजेचं होतं. पण महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असतांना दुर्लक्ष केलं गेलं.

महिला आयोगाने फक्त ट्विटरवील एका पोस्टची दखल घेऊन अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं. या पोस्टरमुळे धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्यानं जनमाणूस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचं आयोगाने नमूद केलं होतं.

मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोग तिच्या नंगानाचची दखल घेणार नाही का? छत्रपती शिवाजी महाजारांच्या महाराष्ट्रात उर्फीचा हा नंगा नाच चालू देणार नाही, असा सज्जड दम यावेळी चित्रा वाघ यांनी दिला.

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून मागच्या काही दिवसांपासून चित्रा वाघ गेल्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. तसंच त्यांनी या मुद्द्यावरुन महिला आयोगाला सवाल केले होते. पण चाकणकर यांनी कुणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही", अशी भूमिका मांडली. यावरुनच चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in