Ishawar Sahu : दंगलीत मारला गेला मुलगा, मजुराने काँग्रेस आमदाराला केला ‘गेम’
छत्तीसगडच्या साजा विधानसभेतही असाच धक्कादायक निकाल लागला. या निकालात 7 वेळा आमदार राहिलेल्या कृषिमंत्री रविंद्र चौबेचा एका मजुराने पराभव केला. ईश्वर साहू असे या मजूराचे नाव असून त्याने पहिल्यांदाच विधानसभा लढवून काँग्रेसच्या तगड्या उमेदवारावर मात केली आहे.
ADVERTISEMENT

Ishwar Sahu Defeats Inc Ravindra Choubey Saja Assembly Election : देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालाने सर्वांनाच चकित केले आहे.यामधील सर्वाधिक धक्कादायक निकाल हा छत्तीसगडचा (Chhattisgarh Assembly Election) लागला. कारण या राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत असताना देखील भाजपने सत्ता काबीज केली.छत्तीसगडच्या साजा विधानसभेतही (Saja Assembly Election) असाच धक्कादायक निकाल लागला. या निकालात 7 वेळा आमदार राहिलेल्या कृषिमंत्री रविंद्र चौबेचा (Ravindra Choubey) एका मजुराने पराभव केला. ईश्वर साहू (Ishwar Sahu)असे या मजूराचे नाव असून त्याने पहिल्यांदाच विधानसभा लढवून काँग्रेसच्या तगड्या उमेदवारावर मात केली आहे. ईश्वर साहु यांच्या विजयाची संपूर्ण छत्तीसगडमध्ये चर्चा आहे. (bjp ishwar sahu defeats inc ravindra choubey in saja assembly election chhattisgarh assembly election)
छत्तीसगड राज्यातील बेमेटारा जिल्ह्यातील साजा विधानसभेतही असाच धक्कादायक निकाल लागला आहे. या मतदार संघातून ईश्वर साहु या मजुराने निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत ईश्वर साहु यांनी भुपेश बघेल यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या रविंद्र चौबेचा पराभव केला. विशेष रविंद्र चौबे सात वेळा आमदार राहिले आहेत, तर ईश्वर साहु यांनी ही पहिलीच निवडणूक लढली होती. तरी देखील चौबेंसारख्या तगड्या उमेदवाराचा ईश्वर साहु यांनी धुळ चारली आहे. त्यामुळे त्याच्या या विजयाची चर्चा आहे.
हे ही वाचा : Cyclone Michaung Updates : मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर, महाराष्ट्राला किती धोका?
5196 मतांनी रविद्र चौबेंचा पराभव
मजूर ईश्वर साहू यांनी भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत साहू यांनी 5 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला. ईश्वर साहू यांना 1 लाख 1 हजार 789 मते पडली होती. तर रविंद्र चौबे यांना 96 हजार 593 मते मिळाली होती. त्यामुळे दोघांच्या मतांमध्ये अवघ्या 5 हजार 196 मतांचे अंतर राहिले.
दंगलीत मुलाचा मृत्यू
भाजपने निवडणुकीदरम्यान बेमेटरा आणि कावर्धा येथील जातीय हिंसाचार आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर नेहमीच निशाणा साधला होता. याच रणनितीनुसार भाजपने रायपूरपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरनपूरच्या ईश्वर साहू या मजूराला तिकीट दिले. कारण ईश्वरचा मुलगा अशाच एका जातीय दंगलीत मारला गेला होता. तसेच निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान देखील ”ईश्वर साहू हा फक्त उमेदवार नाही आहे, तर न्यायाचा प्रतिक आहे”. ”जर भाजप सत्तेत आली तर भुनेश्वर साहूच्या मारेकऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू” असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना दिले होते. भाजपच्या या आश्वासनाचा निकालावर परीणाम झाला आणि ईश्वर साहू निवडणूक जिंकले.