‘लघुशंकेनं धरणाची…’, ‘टिल्ल्या लोक’वरून अजित पवारांवर राणेंचा पलटवार
नितेश राणेंनी (Nitesh Rane) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. त्याबद्दल अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उंचीचा उल्लेख करत खिल्ली उडवली. याच विधानावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जुन्या वादग्रस्त विधानावर (controversial Statement) बोट ठेवत पवारांवर पलटवार केलाय. झालं असं की छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत, धर्मवीर […]
ADVERTISEMENT

नितेश राणेंनी (Nitesh Rane) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. त्याबद्दल अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उंचीचा उल्लेख करत खिल्ली उडवली. याच विधानावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जुन्या वादग्रस्त विधानावर (controversial Statement) बोट ठेवत पवारांवर पलटवार केलाय.
झालं असं की छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत, धर्मवीर नव्हेत, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. त्यावरून भाजपनं आंदोलन केलं आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
भाजपच्या आंदोलनानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. याच पत्रकार परिषदेत त्यांना आमदार नितेश राणेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
‘टिल्ल्या लोकांनी असलं काही…’, अजित पवारांकडून नितेश राणेंची हेटाळणी