सोलापूरमध्ये गुणरत्न सदावर्तेंवर काळं फेकलं; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून निषेध
सोलापूर : येथे पत्रकार परिषदेदरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काळे फेकण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी मराठा समाजाचा विजय असो, एक मराठा-लाख मराठा, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध असो, अशा घोषणा देखील देण्यात आल्या. कालही करावा लागला होता विरोधाचा सामना : शुक्रवारी उस्मानाबाद येथे सदावर्ते यांच्या […]
ADVERTISEMENT

सोलापूर : येथे पत्रकार परिषदेदरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काळे फेकण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी मराठा समाजाचा विजय असो, एक मराठा-लाख मराठा, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध असो, अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
कालही करावा लागला होता विरोधाचा सामना :
शुक्रवारी उस्मानाबाद येथे सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा मराठवाडा आणि विदर्भ राज्य करण्याच्या मागणीसंदर्भात संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान त्यांच्या स्वागताचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींकडून फडण्यात आले होते. त्याचबरोबर मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने काळे झेंडे दाखवून या मागणीचा निषेध करण्यात आला होता.
काळं फेकल्यानंतर काय म्हणाले सदावर्ते?
संवाद यात्रेमुळे बिळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांच्या पिलावळांना साळो की पळो करून सोडलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांना माझा डायलॉग होऊ द्यायचा नाही. छत्रपती शिवरायांचे आम्ही खरे वारसदार मावळे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मी खरा वारसदार आहे.
आज संविधानदिनी आशा प्रकारे काही लोकांना सोडून आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे सेल्युलर जेलमध्ये दिवस घालवून आलो आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी पाणी कम चाय आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.