Sanjay Raut बाहेर येणार! जामीनावर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचाही नकार

उच्च न्यायालयानेही ईडीची मागणी फेटाळली...
Sanjay Raut
Sanjay RautMumbai Tak

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयानेही दिलासा दिला आहे. न्यायालयाने राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळून लावत त्यांचा जामीन कायम ठेवला आहे. अवघ्या काही मिनिटात यावर निर्णय देणं चुकीचं असल्याचं मत नोंदवत ईडीची याचिका फेटाळून लावली. न्यायमुर्ती भारती डंगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.

तसंच ईडीच्या उच्च न्यायालयातील या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला पीएमएलएच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि संजय राऊत यांच्या जामीनाची सर्व कागदपत्र ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेरील पेटीत टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंतच राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संजय राऊत यांना पीएमएलएच्या सत्र न्यायालयानं बुधवारी दुपारी जामीन मंजूर केला होता. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र ईडीकडून राऊत यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला होता. तसंच आपल्याला उच्च न्यायालायत जायचं आहे, असं सांगत ईडीने जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र पीएमएलए न्यायालयाने राऊतांचा जामीन कायम ठेवतं त्यांना दिलासा दिला.

त्यानंतर ईडीने याप्रकरणी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता याप्रकणावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अवघ्या काही मिनिटात यावर निर्णय देणं चुकीचं असल्याचं मत नोंदवत ईडीची याचिका फेटाळून लावली. तसंच ईडीच्या उच्च न्यायालयातील या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in