महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? एकनाथ शिंदेंचं बंड फसलं तर काय असेल चित्र?

मुंबई तक

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना बळ दिले जात असून, त्यांचं बंड शमवण्यात उद्धव ठाकरे यांना अपयश आलं, तर सरकार कोसळेल का? अशी चर्चा सुरू झालीये. शिंदेंनी शिवबंधन तोडलं आणि राज्यातील सद्यस्थिती लक्षात घेतली तर काही शक्यता निर्माण होतात, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना बळ दिले जात असून, त्यांचं बंड शमवण्यात उद्धव ठाकरे यांना अपयश आलं, तर सरकार कोसळेल का? अशी चर्चा सुरू झालीये. शिंदेंनी शिवबंधन तोडलं आणि राज्यातील सद्यस्थिती लक्षात घेतली तर काही शक्यता निर्माण होतात, त्या पुढीलप्रमाणे…

ठाकरे सरकारविरुद्ध अविश्वास ठराव

शिवसेनेविरोधात बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडण्याबरोबरच आमदारकीही शाबूत ठेवायची असेल, तर शिंदे यांना सेनेचे ३७ आमदार फोडावे लागणार आहे म्हणजे त्यांना पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण मिळेल.

३७ आमदार घेऊन एकनाथ शिंदे नवीन पक्ष स्थापन करू शकतात. नवीन पक्षाच्या माध्यमातून भाजपला पाठिंबा दिला जाऊ शकतो. या माध्यमातून भाजप बहुमताच्या आकड्यापर्यंत जाऊ शकतो. तर दुसरीकडे शिवसेनेला भगदाड पडल्यानं महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येऊन कोसळू शकतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp