पुणे – इंदापूरमध्ये टोकाचे विरोधक झाले गणपती बाप्पाच्या पालखीचे भोई

मुंबई तक

पुणे : राज्यभरात गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत पार पडले. या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात देशभरात गणपती मंडळ, देखावे, मिरवणूक यानिमित्ताने सर्वजण एकत्र आल्याचे दृश्य पाहायला मिळाले होते. याला आजचा शेवटचा दिवसही अपवाद नव्हता. आज पुणे आणि इंदापुरमध्येही राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविणारे चित्र पाहायला मिळाले. आज पुण्यात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

पुणे : राज्यभरात गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत पार पडले. या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात देशभरात गणपती मंडळ, देखावे, मिरवणूक यानिमित्ताने सर्वजण एकत्र आल्याचे दृश्य पाहायला मिळाले होते. याला आजचा शेवटचा दिवसही अपवाद नव्हता.

आज पुणे आणि इंदापुरमध्येही राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविणारे चित्र पाहायला मिळाले. आज पुण्यात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील तर इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील-प्रदिप गारटकर या टोकाच्या विरोधकांनी एकत्र गणपतीची पालखी उचलली.

पुण्यात नेमके काय झाले?

मुंबईनंतर आदित्य ठाकरे यांनी पुणे येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु होताना आदित्य ठाकरे पोहचले. त्याचवेळी पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील हेही तिथे उपस्थित होते. दोन विरोधक समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांची काहीशी काळजी वाढली होती. मात्र दोघांनी राजकीय परिपक्वता बाजूला ठेवून मानाच्या कसबा गणपतीची एकत्र पालखी उचलली.

हर्षवर्धन पाटील-प्रदीप गारटकर यांनी दिला मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला खांदा