एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरच ठोकला दावा! निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी बंडखोर शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून घोषित करत नवी कार्यकारिणी जाहीर केली. त्यानंतर लोकसभेतील गटनेते बदलत आता केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. आमदारांच्या बंडखोरीपासून शिवसेनेत सुरू झालेली धक्क्यांची मालिका सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी बंडखोर शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून घोषित करत नवी कार्यकारिणी जाहीर केली. त्यानंतर लोकसभेतील गटनेते बदलत आता केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे.
आमदारांच्या बंडखोरीपासून शिवसेनेत सुरू झालेली धक्क्यांची मालिका सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या झालेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना : ‘हेमंत गोडसे ते धैर्यशील माने यांचे गोत्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच’
बंडखोरी केल्यापासून शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. याच आधारे शिंदे गटाने बैठक घेत शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त केली आणि नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात जुन्या नेत्यांना बाजूला सारत शिंदेंना समर्थन देणाऱ्या नेत्यांना कार्यकारिणीत संधी देण्यात आलीये.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या घटना घडल्या आहेत. शिंदे यांनी १२ खासदारांसह त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे गटनेते म्हणून मान्यता दिली.
लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर आता शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. शिंदेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं असून, यात शिवसेनेवर दावा करण्यात आला आहे. शिवसेनेतील बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवी कार्यकारिणी नियुक्त केली आहे, असं शिंदे गटाने पत्रात म्हटलंय.
उद्धव ठाकरे Vs एकनाथ शिंदे : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, कुणाच्या किती याचिका?
उद्धव ठाकरेंनी आधीच घेतलीये धाव
दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने नवी कार्यकारिणी निवडली. त्यानंतर शिंदे गट केंद्रीय आयोगाकडे जाण्याचा अंदाज उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे शिवसेनेनं आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
शिवसेनेनं आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे. कुठल्याही गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आला, तर त्यावर निर्णय घेण्याआधी आम्हाला बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, असं शिवसेनेनं या पत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आता निवडणूक आयोगाच्या निकालाकडंही लागलं आहे.