शिवसेनेला मोठा धक्का, निवडणूक आयोगाकडून सुहास कांदेंचं मत रद्द, मतमोजणी सुरु करण्याचे आदेश
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावर भाजप आणि महाविकास आघाडीने घेतलेल्या आरोपावर गेल्या अनेक तासापासून निवडणूक आयोगाची बैठक सुरु होती. आता मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक नुकतीच संपली असून याबाबत निर्णय जाहीर केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द ठरवलं आहे. हे एक मत वगळून उर्वरित 284 मतांची मोजणी करण्याचे आदेश आयोगाने दिलं […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावर भाजप आणि महाविकास आघाडीने घेतलेल्या आरोपावर गेल्या अनेक तासापासून निवडणूक आयोगाची बैठक सुरु होती. आता मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक नुकतीच संपली असून याबाबत निर्णय जाहीर केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द ठरवलं आहे. हे एक मत वगळून उर्वरित 284 मतांची मोजणी करण्याचे आदेश आयोगाने दिलं आहे.
याचा अर्थ भाजपकडून जे तीन आक्षेप घेण्यात आले होते त्यापैकी दोन आक्षेप आयोगाने फेटाळले आहेत. तर महाविकास आघाडीने सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्याबाबत जे आक्षेप घेतले होते ते आक्षेप देखील आयोगाने फेटाळले आहेत. त्यामुळे आता 284 मतांमधून राज्यसभेसाठीचे उमेदवार निवडले जाणार आहेत.
LIVE UPDATE:
-
आमचे चारही उमेदवार निवडून येतील – जयंत पाटील