जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करणार : नुतन पालकमंत्री केसरकर यांची ग्वाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राजस्थानमधील जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या पर्यटनाबाबत विकास करणार अशी ग्वाही कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शनिवारी रात्री पालकमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरची जबाबदारी मिळाली ही आई अंबाबाईची कृपा आहे, असेही ते म्हणाले.

केसरकर पुढे बोलताना म्हणाले, छत्रपती शाहु महाराज, युवराज संभाजीराजे या सर्वांनाच वाटते की पर्यटनासोबत आपला इतिहासही लोकांपर्यंत गेला पाहिजे. जयपूरप्रमाणेच भव्य वास्तू आणि जाज्वल्य इतिहास कोल्हापूर आणि साताऱ्याला आहे. सिंधुदुर्गप्रमाणेच कोल्हापूरमध्येही प्रगतशील शेतकरी आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार.

पालकमंत्र्यांची घोषणा :

शनिवारी रात्री राज्यातील सर्व जिल्ह्यांना हक्काचे पालकमंत्री मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिंदे गटानेही औरंगाबाद, नाशिक, जळगाव असे स्वतःचे गड राखण्यात यश मिळविले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केसरकरांना कोल्हापूर आणि मुंबईची जबाबदारी :

या पालकमंत्रीपदाच्या यादीवर नजर टाकल्यास सिंधुदुर्गबाबत आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो. सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर आणि मुंबईचे पालकमंत्री म्हणून संधी देत शिंदे-फडणवीसांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे.

त्याचवेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यातून आमदार असलेल्या रविंद्र चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यातून शिंदे-फडणवीस यांनी सिंधुदुर्गमध्ये भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दीपक केसरकरांमधील वाद टाळल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग भाजपला देऊन रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेने घेतलं?

यापूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद फडणवीस आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडे होते. तर रायगडचे पालकमंत्रीपद आधी भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. फडणवीस सरकारमध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून केसरकर आणि नंतर उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी होती. .

ADVERTISEMENT

तर रायगडचे पालकमंत्रीपदी आधी प्रकाश मेहता नंतर रविंद्र चव्हाण आणि मविआ काळात आदिती तटकरे होत्या. आता नवीन यादीत सिंधुदुर्ग भाजपकडे गेले असून रायगड शिवसेनेकडे गेले आहे. सिंधुदुर्गची जबाबदारी ठाण्याचे भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना देण्यात आली आहे. तर रायगडची जबाबदारी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT