मी अमृताकडे वळतो म्हटलं तर तुम्ही वेगळाच अर्थ काढाल: देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

Devendra Fadnavis: मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (9 मार्च) सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला. यावेळी या अर्थसंकल्पाचा मांडणी ही पंचामृत ध्येयावर करण्यात आली. पाच महत्त्वाच्या मुद्दे मांडत देवेंद्र फडणवीस यांनी आपला अर्थसंकल्प मांडला. मात्र, यावेळी त्यांनी शेवटच्या मुद्दाकडे वळताना जी टिप्पणी केली त्यामुळे विधानसभेत एकच हशा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Devendra Fadnavis: मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (9 मार्च) सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला. यावेळी या अर्थसंकल्पाचा मांडणी ही पंचामृत ध्येयावर करण्यात आली. पाच महत्त्वाच्या मुद्दे मांडत देवेंद्र फडणवीस यांनी आपला अर्थसंकल्प मांडला. मात्र, यावेळी त्यांनी शेवटच्या मुद्दाकडे वळताना जी टिप्पणी केली त्यामुळे विधानसभेत एकच हशा पिकला. (devendra fadnavis made a funniest comment while presenting the budget)

‘मला सावधानतेने बोलावं लागतं कारण अमृताकडे…’

देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृताच्या आधारे आपल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी प्रत्येक महत्त्वाच्या अमृतातील मुद्द्यांचं विश्लेषण केलं. पण जेव्हा ते शेवटच्या अमृताकडे म्हणजे पंचामृताकडे वळले तेव्हा असं काही घडलं की, संपूर्ण सभागृह हे खळखळून हसलं..

त्याचं झालं असं की, देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृता पैकी चार मुद्दे विशद केल्यानंतर ते पाचव्या मुद्द्याकडे वळले. त्यावेळी ते असं म्हणाले की, ‘यानंतर मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडे वळतोय.. पंचम अमृत..’

देवेंद्र फडणवीस म्हणताच विरोधकांनी ‘पंचामृत.. पंचामृत..’ असं जोरजोरात म्हणत फडणवीसांना दुरुस्ती करण्यास सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp