‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही’, फडणवीसांनी लावला ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ

मुंबई तक

चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीवरून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. आव्हान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ते विरोधी पक्षनेते असतानाच व्हिडीओही लावला. ठाकरेंनी व्हिडीओ लावल्यानंतर फडणवीसांनी लागलीच प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आणि ठाकरेंचा जुना व्हिडीओ दाखवत ‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही’, असं म्हणत पलटवार केलाय. चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी वीज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीवरून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. आव्हान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ते विरोधी पक्षनेते असतानाच व्हिडीओही लावला. ठाकरेंनी व्हिडीओ लावल्यानंतर फडणवीसांनी लागलीच प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आणि ठाकरेंचा जुना व्हिडीओ दाखवत ‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही’, असं म्हणत पलटवार केलाय.

चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना घेरलं. देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ ठाकरेंनी लावल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ काढला.

शेतकरी वीज बिल माफीवरून फडणवीसांनी ठाकरेंना काय दिलं उत्तर?

‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय…’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विटवर शेअर केलाय.

Uddhav Thackeray : ठाकरेंनीही लावला फडणवीसांचा व्हिडीओ; म्हणाले, ‘देवेंद्र जनाची नाही, तर मनाची लाज बाळगा’

हे वाचलं का?

    follow whatsapp