MLA Disqualification: CM शिंदेंविरोधात निकाल गेला तर.. असं बदलेल महाराष्ट्राचं राजकारण
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस सर्वार्थाने महत्वाचा आहे. सत्ताधाऱ्यांसाठीही आणि विरोधकांसाठीही. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून सादर केलेल्या याचिकांवर आजचा निर्णय देण्यात येणार असल्याने त्याचा आगामी काळातील निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.
ADVERTISEMENT

CM शिंदेंच्या विरोधात निकाल आल्यास महाराष्ट्राच राजकारण कसं असणार?
MLA Disqualification: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस प्रचंड महत्वाचा आहे. पक्षांतराविरोधात अपात्रतेच्या याचिकांवर सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज निर्णय देणार आहेत. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उभा ठाकले आहेत. त्यामुळे आजच दिवस दोन्ही गटासाठी महत्वाचा आहे.
अपात्रतेला आव्हान
ठाकरे गटाने आधी 16 आमदारांवर आणि नंतर 24 आमदारांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे सर्व 40 आमदारांना हा निर्णय लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्याचवेळी शिंदे गटानेही अपात्रतेला आव्हान देत ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
आमदारांची पदंही रद्द
शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून याचिका दाखल केल्या गेल्या असल्या तरी सभापती मात्र एकाच गटाच्या बाजूने निर्णय देणार आहेत. त्यामुळे या निकालामध्ये शिंदे गट अपात्र ठरल्यास उद्धव गट पात्र ठरणार आहे. त्यामुळे अपात्र आमदारांची पदंही रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आता काही महिन्यांवर विधानसभेचंही बिगुल वाजणार आहे.