पदवीधर उमेदवार सत्यजीत तांबेंच्या पदवीवरचं शंका; उमेदवारी अडचणीत येणार?

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या पदवीवरच शंका घेण्यात आल्यानं त्यांची उमेदवारी अडचणीत येणार?
Satyajeet Tambe graduation Degree
Satyajeet Tambe graduation Degree (फोटो सौजन्य: Facebook)

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या पदवीवरच शंका घेण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास, अभिजीत खेडकर यांनी तांबेंच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर शंका उपस्थित करत काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंत तांबे यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली असल्याचा आरोप करतं याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे.

सत्यजीत तांबे यांच्या माहितीबद्दल आक्षेप घेताना डॉ. अभिषेक हरिदास, अभिजीत खेडकर यांनी तांबे यांचे २०१४ मधील अहमदनगर शहर विधानसभेची निवडणूक लढविताना दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आणि २०२३ मध्ये नाशिक पदवीधर विधानपरिषदेची निवडणूक लढविताना दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यांच्यातील माहितीची तुलना केली आहे. यातील संपत्तीची माहिती आणि शैक्षणिक माहितीबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत.

काय आहेत डॉ. अभिषेक हरिदास आणि अभिजीत खेडकर यांचे आक्षेप?

  • वर्ष २०१४ मध्ये सत्यजीत तांबेंनी मौजे पिंपरणे (ता. संगमनेर) येथील स.नं.७२ हि शेतजमीन दि. ०४/०४/२००९ रोजी ४,८०,००० रुपयात खरेदी केली होती असे नमूद केले आहे. तर सन २०१९ साली त्यांनी हीच शेतजमीन दि ४/०४/२००९ रोजी ५,१२,००० रुपयात खरेदी केली आहे असे नमूद केले आहे.

  • वर्ष २०१४ साली सत्यजीत यांनी BBA (VMRF, TAMILNADU), DEC 2005, MBA (MIT SCHOOL OF MANG PUNE) PUNE UNIVERSITY, BA-POLITICAL SCIENCE (TECNO GLOBAL UNIVERSITY), MA-POLITICAL SCIENCE (PUNE UNIVERSITY) 2014, ECX EDU FOR IMARGING LEADERS (HAWARD UNIVERSITY) 2014 अशा सर्व शैक्षणिक पदव्या नमूद केल्या होत्या.

  • मात्र वर्ष २०२३ मध्ये तांबे यांनी BBA VMU UNIVERSITY, DEC 2005 असे नमूद केले आहे.

  • तांबे यांनी उल्लेख केलेल्या विद्यापीठाची स्थापना ही २००५ नंतर झाली आहे.

  • दोन्ही प्रतिज्ञापत्रात BBA दोन वेगवेगळ्या विद्यापीठातून झाल्याचे नमूद केले आहे.

  • वर्ष २०२३ मध्ये त्यांनी केवळं एकाच डिग्रीचा उल्लेख त्यांनी केला आहे. BBA वगळता तांबे यांनी इतर शैक्षणिक गुणवत्ता का लपवली?

  • सत्यजीत तांबे यांनी म्युचुअल फंडामधील युनिटचा तपशील लपविला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in