संभाजीराजेंमुळे राज्यसभेची निवडणूक प्रचंड चर्चेत, समजून घ्या या निवडणुका होतात तरी कशा!
मुंबई: राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. या सहाही जागा महाराष्ट्र विधानसभेतून असणार आहे. त्यातच संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळ राज्यसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तर आपण जाणून घेऊयात राज्यसभेची निवडणूक नेमकी होती तरी कशी. भारतात बायकॅमरल पार्लमेंटरी सिस्टिम आहे. म्हणजेच 2 […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. या सहाही जागा महाराष्ट्र विधानसभेतून असणार आहे. त्यातच संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळ राज्यसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तर आपण जाणून घेऊयात राज्यसभेची निवडणूक नेमकी होती तरी कशी.
भारतात बायकॅमरल पार्लमेंटरी सिस्टिम आहे. म्हणजेच 2 सभागृह एक लोकसभा आणि एक राज्यसभा. राज्यसभा हे अप्पर हाऊस आहे. जशी लोकसभा विसर्जित होते, तशी राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी इथले काही सदस्य निवृत्त होतात आणि नवे सदस्य निवडून येतात. पण जसे लोकसभेचे सदस्य लोकांमधून निवडून येतात, तसे राज्यसभेचे सदस्य लोकांमधून नाही, पण तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदारच राज्यसभेचे सदस्य निवडतात.
कशी होते राज्यसभेची निवडणूक, राज्यातल्या आमदारांच्या संख्येवर राज्यसभेची गणितं कशी ठरतात हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
संविधानातील आर्टिकल 83(1) नुसार राज्यसभा स्थायी सभागृह आहे. त्याचं विघटन हे करता येऊ शकत नाही. राज्यसभेचे एकूण सदस्य 245 असतात. ज्यामध्ये 12 खासदार हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. त्यांच्या व्यतिरिक्त उरलेले 233 खासदार निवडणुकीने राज्यसभेवर निवडून जातात.