Hasan Mushrif: आधी मलिक, नंतर मी विशिष्ट धर्माच्या लोकांवर..: मुश्रीफ

ED Raid: विशिष्ट जातीधर्मावरील लोकांवरच केंद्रीय संस्थांकडून कारवाई केली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या छापेमारीनंतर केले आहेत केले आहेत.
ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफांनी काय दिलं स्पष्टीकरण
ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफांनी काय दिलं स्पष्टीकरणMumbai Tak

Hasan Mushrif Reaction on ED Raid: कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरासह, कारखाना आणि नातेवाईकांच्या घरी एकाच वेळी ईडीकडून (ED) छापे मारण्यात आले आहेत. ज्यानंतर कोल्हापुरात (Kolhapur) हसन मुश्रीफांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनं सुरु केली आहेत. ज्यानंतर हसन मुश्रीफांनी सोशल मीडियावरुन आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, यावेळी मुश्रीफांनी ईडीची कारवाई ही विशिष्ट धर्माच्या लोकांवर कारवाई होत असल्याचा आरोप करत केंद्र आणि राज्य सरकारवर थेट टीका केली आहे. (first malik then me action being taken against people of certain religions hasan mushrif accused government)

'आधी नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे आता किरीट सोमय्या म्हणतात की, अस्लम शेख म्हणजे.. विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टार्गेट करण्याचं ठरवलं आहे की काय? अशी शंका यातून निर्माण होते.' असं म्हणत मुश्रीफांनी या कारवाईबाबतच सवाल उपस्थित केला आहे.

पाहा हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले:

'आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या नातेवाईकांच्या घरावर त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे घातल्याचं समजतं आहे. मी काही कामानिमित्त बाहेर असल्याने मला फोनवरुन ही बातमी समजली. कारखाना, निवासस्थान आणि सर्व नातेवाईकांची घरं हे तपासण्याचं काम सुरु आहे.'

'सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवावी. आताच प्रसारमाध्यमांमध्ये कागल तालुक बंद केल्याची जी घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी. त्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणाने सहकार्य करावं. ही विनंती करतो.'

ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफांनी काय दिलं स्पष्टीकरण
Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा
'कोणताही दंगा करु नये. किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य माझ्यासाठी आपण करु नये ही माझी विनंती आहे. यापूर्वी सुद्धा अशाप्रकारचे छापे पडले होते. सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतलेली होती.' 'पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आला आहे याची काही मला माहिती नाही. वास्तविक 30-35 वर्षांचा माझं सार्वजनिक जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे. त्यामुळे दीड-दोन वर्षांपूर्वी देखील जी कारवाई झाली होती त्यातूनही काही निष्पन्न झालं नव्हतं. पुन्हा कोणत्या हेतूने हा छापा घातला हेही सांगता येत नाही.'
ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफांनी काय दिलं स्पष्टीकरण
Kirit Somaiya यांनी आरोप केलेले हसन मुश्रीफ आहेत शरद पवारांचे खंदे समर्थक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल!

'मी सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करेनच परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना मी शांततेचं आवाहन करतो.'

'चारच दिवसांपूर्वी कागल तालुक्याचे भाजपचे नेते यांनी दिल्लीत अनेक वेळा चकरा मारुन माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरु केले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, चारच दिवसात मुश्रीफांवर ईडीची कारवाई होणार आहे.'

'अशा पद्धतीने नाउमेद करण्याचं काम हे जे चाललं आहे ते अतिशय गलिच्छ राजकारण चाललं आहे. कारण जर राजकारणात अशा पद्धतीने कारवाया होत असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे.' 'आधी नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे आता किरीट सोमय्या म्हणतात की, अस्लम शेख म्हणजे.. विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टार्गेट करण्याचं ठरवलं आहे की काय? अशी शंका यातून निर्माण होते.'

असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या छापेमारीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in