Bharat Ratna: मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ नेत्याला भारतरत्न जाहीर!

रोहित गोळे

Bharat Ratna to Karpoori Thakur: केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

former chief minister of bihar karpoori thakur will get bharat ratna big announcement of modi government
former chief minister of bihar karpoori thakur will get bharat ratna big announcement of modi government
social share
google news

Bharat Ratna: केंद्रातील मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. बुधवारी कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (former chief minister of bihar karpuri thakur will get bharat ratna big announcement of modi government)

याबाबत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत घोषणा केली आहे.

जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. या घोषणेनंतर जेडीयूने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

’36 वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळाले’

कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, ‘आम्हाला 36 वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या 15 कोटी जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानू इच्छितो.’

कर्पूरी ठाकूर कोण होते?

कर्पूरी ठाकूर यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील पितौझिया गावात झालेला. 1940 मध्ये पाटणा येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. कर्पुरी ठाकूर यांनी आचार्य नरेंद्र देव यांच्यासोबत जाणं पसंत केलं. यानंतर त्यांनी समाजवादाचा मार्ग निवडला आणि 1942 मध्ये गांधींच्या असहकार चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरुंगातही राहावे लागले होते.

हे ही वाचा>> Govindgiri: ‘मी मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केली नाही, फक्त..’, गोविंदगिरी महाराजांचा यू-टर्न

1945 मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कर्पूरी ठाकूर हळूहळू समाजवादी चळवळीचा चेहरा बनले, ज्याचा उद्देश ब्रिटीशांपासून स्वातंत्र्याबरोबरच समाजात प्रचलित असलेला जातीय आणि सामाजिक भेदभाव दूर करणे हा होता, जेणेकरून दलित, मागासलेले आणि वंचितांना मदत करणं आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल.

1952 मध्ये पहिल्यांदा झाले आमदार

कर्पूरी ठाकूर 1952 मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून विजयी होऊन आमदार झाले. 1967 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, युनायटेड सोशालिस्ट पार्टी कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आली, ज्याचा परिणाम म्हणून बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.

हे ही वाचा>> ‘PM मोदींसारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात..’, संजय राऊतांची जहरी टीका

महामाया प्रसाद सिन्हा मुख्यमंत्री झाल्यावर कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. कर्पूरी ठाकूर यांनी शिक्षणमंत्री असताना विद्यार्थ्यांची फी रद्द केली होती आणि इंग्रजीची अटही रद्द केली होती. काही काळानंतर बिहारच्या राजकारणाने असे वळण घेतले की कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री झाले. या काळात ते सहा महिने सत्तेत राहिले. शेतकर्‍यांना नफा न देणार्‍या शेतजमिनीवरील महसूल त्यांनी रद्द केला, 5 एकरांपेक्षा कमी जमिनीचा महसूलही रद्द केला आणि उर्दूला राज्यभाषेचा दर्जा दिला. यानंतर त्यांची राजकीय ताकद प्रचंड वाढली आणि बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकूर समाजवादाचा एक मोठा चेहरा बनला.

मंडल आंदोलनापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp