Uddhav Thackeray: "....तर छगन भुजबळ केव्हाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते"

जाणून घ्या नेमकं उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांच्याबाबत काय म्हटलं आहे?
If Chhagan Bhujbal had stayed in Shiv Sena, he would have become Chief Minister much earlier Says Uddhav Thackeray
If Chhagan Bhujbal had stayed in Shiv Sena, he would have become Chief Minister much earlier Says Uddhav Thackeray

छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले नसते तर केव्हाच मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. छगन भुजबळ यांच्या ७५ चा कार्यक्रम मुंबईत होतो आहे. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आम्ही आता धक्काप्रुफ झालो आहोत

छगन भुजबळ यांनी शिवसेना बसली तेव्हा आम्हाला म्हणजे आमच्या कुटुंबाला पहिला धक्का बसला. बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही शिवसेना सोडली तेव्हा आम्हाला आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला. पण तुम्ही एक चांगलं केलंत की बाळासाहेब ठाकरे असतानाच तुम्ही हे सगळं मिटवलं. माँ असतानाच मिटवलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. छगन भुजबळ यांनी दिलेला जो मानसिक धक्का होता त्यातून सावरताना आम्हाला खूप वेळ गेला. तुम्ही बाळासाहेब असताना सगळं मिटवलं ते चांगलं केलंत. मतभेद मिटवलेत ते बरं झालं. ठीक आहे या सगळ्या गोष्टी काही ठरवून होत नसतात. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आम्ही आता धक्काप्रुफ झालो आहोत. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि शिंदे गटाला टोला लगावला.

अडीच वर्षांपूर्वी जे समीकरण झालं ते पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला

अडीच वर्षांपूर्वी जे समीकरण झालं ते चांगलं होतं. देशात असा प्रयोग पहिल्यांदा झाला. मंत्रालयात नुसता मजल्यांचा एफएसआय नव्हता तर विचारांचा एफएसआय होता. आपलं चांगलं सरकार पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला. त्यामुळे सरकार पाडून, मलाच सगळं पाहिजे या ईर्ष्येने हे सगळं केलं गेलं. आता हल्ली काहीही झालं की कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या. मैदान मिळू नये म्हणून कसले प्रयत्न करताय असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्या खुमासदार भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपला अनेक चिमटे काढले आणि शिंदे गटाला टोले लगावले आहे.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

एकीकडे शरद पवार दुसरीकडे बाळासाहेब असे दोन व्यक्तिमत्त्व छगन भुजबळांना आदर्श म्हणून लाभली. त्यांनी या दोन्ही नायकांचा छगन भुजबळ यांनी दुरूपयोग केला नाही. त्यामुळेच ते उभे आहेत. दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वं तुमच्या आयुष्यात आली त्यांचा आदर्श घेऊन छगन भुजबळ यांनी त्यांची वाटचाल पूर्ण केली आहे.

छगन भुजबळ शिवसेनेचे एक आमदार होते तेव्हा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना फोन करून सांगितलं होतं की एक माणूस पाठवला आहे. पण तो बोलायला लागला की सगळं सभागृह ऐकत असतं. हल्ली कोण काय बोलतं? जाऊदेत. सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणं किती गरजेचं आहे याचा विचारच कुणी करत नाहीये. छगन भुजबळ यांचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. पहिली निवडणूक हरले होते. आयुष्यातली पहिली निवडणूक हरूनही माणूस जिद्दीने उभा राहिला. बेळगावचा तुमचा फोटो पाहिला तर माझ्यावर पुन्हा हिंदुत्व सोडल्याचा आणखी एक आरोप होईल असं म्हणत पुन्हा भाजपला टोला लगावला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in