Supriya Sule : "मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा"

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं कौतुक
If there should be a Chief Minister, then like Uddhav Thackeray said Supriya Sule
If there should be a Chief Minister, then like Uddhav Thackeray said Supriya Sule

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष मागच्या आठ दिवसांपासून सुरू आहे. पक्षाचे क्रमांक २ चे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. त्यांच्या साथीला शिवसेनेचे ३९ आमदार आहेत. तर इतर १२ अपक्षही आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार या भूमिकेमुळे कधीही कोसळू शकतं अशी स्थिती आहे. अशात सुप्रिया सुळे यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

''मला उद्धव ठाकरे यांचा अभिमान वाटतो. बाळासाहेब नसतानाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना भाविनक आवाहन केलं आहे. मी भविष्य वर्तवू शकत नाही पण कुटुंबातून कुणी सोडून जात असेल तर त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ते उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिमान वाटतो.'' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे गटावरही भाष्य

एकनाथ शिंदे यांच्याकडे ५१ आमदार आहेत. त्यांच्याकडे १४४ ची बहुमताची संख्या नाही. मी ऐकलं की एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बोलत आहेत. दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उदय सामंत युथ विंगमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा आम्ही त्यांच्याविषयी वाईट बोललो नाही. मात्र आता ते आमच्यावर टीका करत आहेत याचा त्रास होतो असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

If there should be a Chief Minister, then like Uddhav Thackeray said Supriya Sule
उद्धव ठाकरेंनी सांगावं गुवाहाटीत आलेला कोणता आमदार तुमच्या संपर्कात? एकनाथ शिंदे यांचं आव्हान

एवढंच नाही तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की बंडखोर आमदारांनी परत आलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे मोठ्या भावाच्या नात्याने सगळ्या चुका पोटात घेतात. जिथे नाती असतात तिथे जबाबदाऱ्या असतात. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या सगळ्या चुका विसरून त्यांना पक्षासोबत घेण्यास उद्धव ठाकरे तयार आहेत. एवढंच नाही तर सर्वांना माफ करायालाही उद्धव ठाकरे तयार आहेत. कुठल्याही कुटुंबात भांड्याला भांडं लागतंच. मात्र आपसातील मतभेद विसरून कुटुंब एकत्र येतं उद्धव ठाकरे यांनी परतण्याचं आवाहन केलं आहे ते ऐकून बंडखोर आमदारांनी परत यावं असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

If there should be a Chief Minister, then like Uddhav Thackeray said Supriya Sule
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे राज्यातलं अभूतपूर्व बंड आहे. कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं आहे. हे बंड इतकं मोठं आमि वेगळं की आहे की त्यामुळे थेट उद्धव ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान आहे. सरकार वाचवण्याचंही त्यांच्यासमोर आहेच. या सगळ्याला ते कसं तोंड देणार तसंच पुढे काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in