कश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

जाणून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
कश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
Kashmiri Pandits will never be let go, assures Chief Minister Uddhav Thackeray

कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात तक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Kashmiri Pandits will never be let go, assures Chief Minister Uddhav Thackeray
जम्मू-काश्मीर: काश्मिरी पंडितावर अतिरेक्यांचा गोळीबार, वेळेत उपचार मिळाल्याने वाचला जीव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.

Kashmiri Pandits will never be let go, assures Chief Minister Uddhav Thackeray
हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर लावून काश्मिरी पंडीतांची समस्या दूर होणार नाही - संजय राऊत

१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते.

शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने कश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in