Abdul Sattar : नॉट रिचेबल सत्तार सापडले! निकटवर्तीयाकडून पाठवला मेसेज
नागपूर : वाशिम येथील गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर नॉट रिचेबल झालेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार अखेर सर्वांसमोर आले आहेत. आज (सोमवारी) दुपारी नागपूरमधील बजाज नगर परिसरातील कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयात ते दाखल झाले. यावेळी सत्तार यांनी बाहेर येण्यास नकार दिला. तसंच माध्यमांसमोर बोलण्यासही नकार दिला. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांकडून एक संदेश माध्यमांना […]
ADVERTISEMENT

नागपूर : वाशिम येथील गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर नॉट रिचेबल झालेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार अखेर सर्वांसमोर आले आहेत. आज (सोमवारी) दुपारी नागपूरमधील बजाज नगर परिसरातील कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयात ते दाखल झाले.
यावेळी सत्तार यांनी बाहेर येण्यास नकार दिला. तसंच माध्यमांसमोर बोलण्यासही नकार दिला. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांकडून एक संदेश माध्यमांना देण्यात आला. त्यानुसार अब्दुल सत्तार आज माध्यमांसोबत बोलणार नाहीत. त्यांच्यावर सभागृहात आरोप झाल्यामुळे ते या आरोपांचं उत्तर सुद्धा विधानसभेत देणार आहेत.
अब्दुल सत्तार यांच्यावर सोमवारी विधानसभेत वाशिम येथील गायरान जमिनीच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या गोष्टीसाठी तुम्हीही तितकेच जबाबदार आहात, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला.
त्यानंतर गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, आरोपांनंतर अब्दुल सत्तार नॉट रिचेबल झाले असल्याची माहिती समोर आली होती. ते आज विधानभवन किंवा रवी भवन स्थित त्यांच्या कॉटेज क्रमांक 16 मध्ये उपस्थित नव्हते. ते फोनलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे ते नॉट रिचेबल झाल्याचं बोललं जात होतं.