देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील १२ जणांना मिळू शकते संधी; कसं असेल नवं मंत्रिमंडळ?

मुंबई तक

महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारा शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार राज्यात येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. सरकार स्थापनेसाठीची लगबग सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ कसं असेल, याची संभावित यादी समोर आली आहे. यात बंडखोरी केलेल्या १२ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. महाराष्ट्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारा शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार राज्यात येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. सरकार स्थापनेसाठीची लगबग सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ कसं असेल, याची संभावित यादी समोर आली आहे. यात बंडखोरी केलेल्या १२ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

महाराष्ट्र भाजप आणि शिंदे गटात चर्चा सुरू असून, मुंबईत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. शिंदे गटातील आमदारांच्या समर्थनाचं पत्र घेऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलीये.

फडणवीस-शिंदे हे लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं प्रयत्न करत असून, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याबद्दलची संभावित यादी समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंचा राजीनामा! राज्यात आता शिंदे-फडणवीसांचं सरकार; एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

हे वाचलं का?

    follow whatsapp