MLC Election 2023 : 'मविआ'तील घोळ! शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

Maharashtra legislative council election 2023 : नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबेंनी अर्जच न भरल्यानं महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरूये...
maharashtra mlc election for five seats : Uddhav Thackeray, Sharad Pawar And balasaheb Thorat
maharashtra mlc election for five seats : Uddhav Thackeray, Sharad Pawar And balasaheb ThoratMumbai Tak

Nashik Graduate’s constituency election Update : विधान परिषदेच्या नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अर्ज न भरल्यानं महाविकास आघाडीत (MVA) राजकीय गोंधळ उडालाय. त्याचबरोबर मविआतील तिन्ही पक्षात विधान परिषद निवडणुकीबद्दल (MLC Election 2023) समन्वय नसल्याचंही नेत्यांच्या भूमिकांवरून समोर आलंय. हा घोळ मिटवण्यासाठी मविआच्या नेत्यांची चर्चा होणार असून, यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांपैकी दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. काँग्रेसनं अमरावती आणि नाशिक मतदारसंघावर दावा केला. पण, नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी पडली. उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्जच दाखल केला नाही. त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेसमधील विसंवाद चव्हाट्यावर आला. त्याचबरोबर मविआतील शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजीही समोर आली.

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असताना आता नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षण मतदारसंघाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेसनं सुधीर तांबे यांचं निलंबन केलं असून, नाशिकमध्ये शिवसेनेनं (UBT) शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मविआतील इतर दोन्ही पक्षही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार का, हे आज स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर आज बैठकही होणार आहे. या बैठकीत मविआची अंतिम भूमिका निश्चित होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलीये.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबद्दल संजय राऊत काय म्हणाले? (Sanjay Raut Reaction)

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस ज्या उमेदवाराला पाठिंबा देईल, त्याला तुमचा (शिवसेना ठाकरे गट) पाठिंबा असेल का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, "यासंदर्भात आज आम्ही दुपारी बसू. आज शेवटचा दिवस आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा? किंवा नागपूरला शिक्षक मतदारसंघात कोणती भूमिका घ्यावी? हे आज ठरेल. आताच थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांचं आणि माझं दूरध्वनीवरून बोलणं झालं. त्याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. एकमेकांशी संवाद सुरू आहेत."

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in