Maharashtra political crisis: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का?”, सरन्यायाधीशांचा सवाल
maharashtra political crisis Supreme court latest news: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या राजीनामाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. राज्यपालांनी अधिकारांचा केलेला वापर योग्य नव्हता असा निष्कर्ष आम्ही काढला तर काय होईल, प्रश्नही यावेळी सरन्यायाधीशांनी विचारला. (Maharashtra political crisis Supreme court hearing, uddhav thackeray vs eknath shinde) ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद […]
ADVERTISEMENT

maharashtra political crisis Supreme court latest news: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या राजीनामाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. राज्यपालांनी अधिकारांचा केलेला वापर योग्य नव्हता असा निष्कर्ष आम्ही काढला तर काय होईल, प्रश्नही यावेळी सरन्यायाधीशांनी विचारला. (Maharashtra political crisis Supreme court hearing, uddhav thackeray vs eknath shinde)
ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “व्हिपची नियुक्ती पक्षाच्या प्रमुखाकडून केली जात नाही असा युक्तिवाद कला जात असेल, न्यायालयाने संसदीय लोकशाही डोक्यावर घ्यावी असं सांगितलं जाईल. व्हिपच्याबद्दल ते असा युक्तिवाद करू शकत नाही की पक्षाच्या नेत्याकडून नव्हे तर गटनेत्याकडून व्हिपची नियुक्ती केली जाते.”
“आपपण स्वातंत्र्य गमावलं आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र हवं असं तुम्हाला वाटतं आहे, तर तुम्ही पक्षाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. इथे कुणीही राजीनामा दिला नाही, ना महिनाभर कुणी निवडणूक आयोगाकडे गेले.”
“पहिली पायरी होती दहाव्या परिशिष्टानुसारची कारवाई थांबवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस पाठवली आणि त्यांना काम कार्यवाही करण्यापासून रोखलं. त्यानंतर दुसरी पायरी होती राज्यपालांना ठराव पाठवणे आणि तिसरी पायरी होती मुख्यमंत्री पदाची शपथ घेणे, त्या पक्षासोबत ज्याच्या मांडीवर तुम्ही गुवाहाटीत बसलेला होतात. विलिनीकरण झालेलंच नाहीये.”