वैभव नाईकांनी आताच राजीनामा द्यावा; राणेंना निवडून आणायला आम्ही समर्थ : भाजपचं आव्हान

स्वानंद बिक्कड

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिंधुदुर्ग : ऐन दिवाळीत तळकोकणात राणे-नाईक वादानं तोंड वर काढलं आहे. हिंमत असेल तर निलेश राणे यांनी 2024 मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी. 2014 मध्ये नारायण राणे यांना पराभूत केलं, निलेश राणेंनाही पराभूत करु, असं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला भाजपकडून प्रतिआव्हान देण्यात आलं आहे.

सावंतवाडीची माजी नगराध्यक्ष आणि नारायण राणे यांचे निकटवर्तीय संजू परब यांनी दोन वर्ष कसली वाट बघता? तुम्हाला जर आमची ताकद आजमावयाची खूमखूमी असेल आणि हिंमत असेल तर वैभव नाईक यांनी आताच आमदारकीचा राजीनामा द्यावा, असं म्हणतं वैभव नाईक यांना प्रतिआव्हान दिलं आहे.

काय म्हणाले संजू परब?

दोन वर्ष कसली वाट बघता? तुम्हाला जर आमची ताकद आजमावयाची असेल तर वैभव नाईक यांनी आताच आमदारकीचा राजीनामा द्यावा, मैदानात उतरावं. जनतेच्या दरबारात निलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. निलेश राणे यांच्यावर प्रेम करणारे भाजपचे आणि नारायण राणे यांचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते वैभव नाईक यांचे आव्हान पेलण्यास समर्थ आहोत. उगाच आमच्या कार्यकर्त्यांना इशारा देऊन वैभव नाईक यांनी उचकावण्याचा प्रयत्न करू नये, असाही इशारा परब यांनी दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आनंद शिरवलकर यांचेही आव्हान :

तर भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर यांनी होय, वैभव नाईक आम्ही तुमचा आव्हान स्वीकारलं आहे, असं म्हटलं. ते म्हणाले, 2024 ची निवडणूक निलेश राणे लढविणार आणि जिंकूनही येणार. पण निलेश राणे यांच्या विजयानंतर वैभव नाईक यांचं पार्सल आम्ही कणकवलीत परत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे दिवाळीतच राजकीय फटाकेही फुटायला लागले आहेत.

चौकशीवरुन झाली सुरुवात :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू आहे. मात्र ही चौकशी आकसातून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तर ही चौकशी म्हणजे भाजपसोबत येण्यासाठी दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.

ADVERTISEMENT

दोन मोर्चांनी तापलं राजकारण :

या चौकशीचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने नुकताच कुडाळमध्ये मोर्चा काढला होता. यावेळी खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश आणि नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, या मोर्चाला चा प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘संविधान समर्थन मोर्चा’ काढला होता. या मोर्चात भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

ADVERTISEMENT

वैभव नाईकांचं आव्हान :

याच मोर्चावरुन वैभव नाईक यांनी भाजपनं आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. कालच्या मोर्चानंतर वैभव नाईक यांनी कुडाळ येथील शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद घेत भाजपच्या मोर्चाला प्रतिउत्तर देत प्रति आव्हानही दिले. ते म्हणाले, कालचा भाजपचा मोर्चा हा संविधान समर्थनासाठी होता. मात्र संविधानाचे समर्थन कालच्या मोर्चात झालेलंच नाही. माझ्यासोबत आला नाही तर हातपाय तोडू टाकेन, बघून घेतो अशा प्रकारच्या धमक्या या मोर्चातून मला दिल्या गेल्या.

पण या धमक्यांना मी भीक घालत नाही. मी चौकशीला सामोरे जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला तर मला फाशी द्या. तसंच हिंमत असेल तर निलेश राणे यांनी 2024 मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी, 2014 मध्ये नारायण राणेंना पराभूत केलं, निलेश राणेंनाही पराभूत करु असं खुलं आव्हान वैभव नाईक यांनी दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT