Manoj Jarange : अजित पवारांना जरांगेंनी सुनावलं; म्हणाले, “तुमच्या माणसाने…”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil slam ajit pawar chhagan bhujbal on maratha reservation maharashtra politics
manoj jarange patil slam ajit pawar chhagan bhujbal on maratha reservation maharashtra politics
social share
google news

Maratha Reservation manoj jarange Patil Ajit Pawar : आधी तुमच्या माणसाने आम्हाला बोलायची गरज नव्हती. 10 ते 15 दिवस मी बोललो नाही. तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून वातावरण दूषित केले, असा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (manoj jarange Patil) उप मुख्यमंत्री अजित पवारांसह (Ajit Pawar) छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) चढवला आहे. जरांगे पाटील अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये बोलत होते. (manoj jarange patil slam ajit pawar chhagan bhujbal on maratha reservation maharashtra politics)

अजित पवार यांनी छगन भूजबळांना तंबी दिली आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले की, अजित पवारांचा माणूस ठेप्याला आला तर आम्ही ठेप्याला येऊ. आम्ही आधी वाटेला जात नाही. मात्र तुमचा माणूस आखडाना, पहिला पाऊस पडल्यासारखा तो पळतोय, असे टोला जरांगेनी लगावला.

हे ही वाचा : MLA Disqualification : ‘ही पद्धत पक्षपाती”, ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

तसेच तुमचा माणूस धडाधड बोलत असताना माझ्याकडून काय अपेक्षा करता. मी दहा-ंपंधरा दिवस बोललो नव्हतो. मात्र तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून वातावरण दूषित केले. आम्ही बोललो तर तुम्हाला काय वाईट वाटतं, पण तुमचा माणूस बोलल्यावर तुम्हाला वाईट नाही वाटलं का..? असा सवाल जरांगेनी अजित पवारांना केला. तुमचा माणूस गप्प बसला तर आम्ही गप्प बसू. 1 तारखेपर्यंत बघतो त्यांचा माणूस गप्प बसतो का? असे देखील जरांगे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, आम्हाला ज्ञानाचे सल्ले देण्यापेक्षा यांना वेळीच रोखा, ते थांबले तर आम्ही थांबू असे जरांगे पाटील म्हणालेत. तसेच ते बोर्ड फाडण्याचा काय संबंध होता. याला कुणाच पाठबळ आहे. तुम्ही दोघेच मला प्रश्न विचारताय, म्हणजेच तुमच्या दोघात काहीतरी ठरलंय. म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा देताय. तसेच याला तंबी दिली त्याला तंबी दिली ही सर्व नाटक आहेत. तंबी दिली काल बोर्ड फाडलं आज सकाळी. बोर्ड फाड्ण्याची तंबी दिली का? असा सवाल जरांगेनी पवारांना केला.

हे ही वाचा : Rajouri Encounter : घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् सीमेवर आलं वीरमरण; ह्रदयद्रावक कहाणी

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मनोज जरांगेना समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबाबत आकस आणि द्वेष ठेवून चालणार नाही, या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली होती. यावर आता त्यांनी सुरु केले की काय,अशी मिश्कील टीका केली.

ADVERTISEMENT

मी काही भडकावू वक्तव्य करत नाही. समाजाबद्दल आधी बोलत नाही, मी माझे झाकून ठेवत नाही. त्यांनी दंगली, मारामारीची भाषा करायची आणि समाजाबद्दल द्वेषपुर्ण आम्ही बोलतो. थांबा मला व्हिडिओ बघू द्या, आता त्यांनी सोडून यांनी सुरु केले की काय? असा सवालच जरांगेनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

तसेच तुम्हाला काय झालय माझ मलाच कळेना, मी तुम्हाला संताजी धनाजीसारखा का दिसायला लागलोय. इतके काय घाबरलाय, एक-एक जण टप्प्याने येताय असे जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील फडणवीसांवर टीका करताना म्हणाले की, आरती करायला गेलेत की कोपरे कापरे शोधायला गेलेत. तुम्ही तुमची माणस थांबवा आम्ही आमच्या थांबवतो, असे जरांगे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT