Navneet Rana: 'शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या', रवी राणांचा खळबळजनक दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या: रवी राणा
पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या: रवी राणा
social share
google news

Ravi Rana BJP Sharad Pawar: धनंजय साबळे, अमरावती: 'कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे.' असं विधान करत NCP- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची चांगलीच कोंडी केली आहे. पवारांच्या या विधानाचा मतदारांवर काय फरक पडू शकतो याची जाणीव असल्याने नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी तात्काळ यावर प्रतिक्रिया देत एक खळबळजनक दावा केला आहे. (lok sabha election 2024 amravati navneet rana joined bjp only with sharad pawars blessings ravi rana sensational claim)

'शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या, पवार साहेबांच्या मनात भाजपच आहे.. त्यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं.. फक्त सुप्रिया ताईंच्या हट्टामुळे त्यांना थांबावं लागलं..' असा खळबळ उडवून देणारा दावा रवी राणा यांनी यावेळी केला आहे.

शरद पवारांबाबत रवी राणा नेमकं काय म्हणाले?

आज नवनीत राणा यांना पवार साहेबांच्या आशीर्वादामुळेच संधी मिळाली खासदार बनण्याची. भाजपमध्ये जाण्याआधी नवनीत राणांनी पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना.. मला असं वाटतं की, पवार साहेब आमच्यासाठी नेहमी आदरणीय आहेत. पण ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवार साहेबांची सुद्धा इच्छा होती.. म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं. अचानक सुप्रिया ताईच्या हट्टापायी त्यांना कुठे तरी थांबावं लागलं. पण पवार साहेबांच्या मनात भाजप आहे आणि ओठावर फक्त विरोध आहे..

'पवार साहेबांच्या मनातील भाजपमध्येच नवनीत राणा आहेत..  मला वाटतंय की, पवार साहेब हे आतून.. म्हणजे मनातून पूर्णपणे नवनीत राणांना पाठिंबा देत आहेत.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी होतो तर त्यांनी...'

'काँग्रेसच्या, उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे आज ते बोलले असतील.. पण मला त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट माहितीआहे. पवार साहेबांचे आणि माझे संबंध खूप चांगले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे.. तर भाजप आहे.. हे मला माहिती आहे..'

अशी प्रतिक्रिया देत रवी राणा यांनी शरद पवारांनी नवनीत राणांविरोधात जो राजकीय डाव टाकला होता त्याची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

ADVERTISEMENT

'मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. एक चूक माझ्याकडून झाली', अमरावतीत पवार नेमकं काय म्हणालेले?

"आज या ठिकाणी मी आलो, ते एक गोष्ट सांगण्यासाठी... मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. एक चूक माझ्याकडून झाली. पाच वर्षापूर्वीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं."

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> शरद पवारांचा नवनीत राणांविरोधात 'सातारा पॅटर्न', मेसेज काय?

"गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव हा बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की, कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणारं, अशा बळवंतराव वानखेडेंना तुम्ही मोठ्या मताने विजयी करा. हे सांगण्यासाठी मी इथे आलोय", असं शरद पवार म्हणाले होते. 


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT