Maratha Reservation: ‘तुम्हाला बाथरूम सुद्धा उघडता येणार नाही’, मनोज जरांगेंकडून भुजबळांना पुन्हा आव्हान

रोहित गोळे

ADVERTISEMENT

maratha samaj will take reservation only from obc manoj jarange challenges chhagan bhujbalan again in public meeting in jalna
maratha samaj will take reservation only from obc manoj jarange challenges chhagan bhujbalan again in public meeting in jalna
social share
google news

Manoj Jarange vs Chhagan Bhujbalan: जालना: मराठा आरक्षणसाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळावर हल्ला चढवला आहे. ‘मी तुला भीत नाही.. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. तुला काय करायचं ते कर.. ओबीसीतूनच आरक्षण घेणार..’ असं म्हणत जरांगेंनी यावेळी थेट आव्हान दिलं आहे. जालन्यातील जाहीर सभेत ते बोलत होते. (maratha society will take reservation only from obc manoj jarange challenges chhagan bhujbalan again in public meeting in jalna)

मनोज जरांगेनी पुन्हा भुजबळांना सुनावंल, ‘मी तुला..’

मराठा ओबीसी आरक्षणातून आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण न देण्याचा चंग या माणसाने बांधला. मराठ्यांना असणारं आरक्षण या व्यक्तीने मिळू दिलं नाही.. खायची सवय लागली, फुकटचं किती खावं ते कळंना.. आम्ही आमच्या मराठ्यांच्या पोरांचं हक्काचं आरक्षण मागतोय. मी काही चूक करत नाही. यांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली. मी माझ्या जातीच्या लेकरांच्या वेदना मांडल्या.

जास्तीचं आरक्षण तू खातो.. आमचं आम्हाला दे ही मागणी मी केली. मी काय चूक केली? तू जर मला, माझ्या मराठा समाजाला दुश्मन मानणार असेल तर मीही तुला भीत नाही.. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. तुला काय करायचं ते कर.. ओबीसीतूनच आरक्षण घेणार..

सरकार कसं देत नाही तेही मराठा समाज पाहणार आहे.. आम्ही दंड आणि मांड्या दोन्ही थोपटल्या आहेत. होऊन जाऊ दे काय व्हायचं ते.. तुम्ही जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांनी शांततेत जरी आंदोलन केलं तरी तुम्हाला बाथरूम सुद्धा उघडता येणार नाही हे लक्षात ठेवा.

तुम्ही त्याच्या एकट्याच्या दबावाखाली येऊन जर माझ्या करोडो मराठा समाजाचं वाटोळं केल्याचं काम केलं तर तुम्हाला सुट्टी नाही.

सरकारने यापुढे विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला शेवटची विनंती आहे. याच्या दबावात येऊन तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं आणि मराठ्यांचा घात केला तर तुमची सुद्धा गाठ या महाराष्ट्रातील मराठ्यांशी आहे.

आम्ही आमच्या मर्यादेत आहोत. आम्ही तुमच्या शब्दाचा मानसन्मान केलाय. म्हणून तुम्हाला 24 डिसेंबर तारीख दिलीए. पण जर तुम्ही दगाफटका जर केला.. आंदोलन शांततेत असेल परंतु ते किती डेंजर असेल ते तुम्हाला कळेल. थांबा आता नाही सांगत..

तो तर बोलायचाच बंद झाला.. दोन दिवस झाले.. सातबारा कुठे आहे ते विचारत होता. सातबारा कुठे आहे ते सांगितलं. मी एकच शब्द काढला तोच शब्द त्याने उचलून धरला आणि त्याने महापुरुषांच्या जाती उकरून काढल्या.

आतापर्यंत महापुरुषाच्या जाती कोणी काढल्या होत्या का? हा महापुरुषांपेक्षा मोठा समजतोय का? सरकार याला हिंडूच कसं काय देतंय? म्हणजे सरकारनेच सांगितलं का, तू जाती काढत जा आम्ही तुझ्या मागे आहोत.. अशा शब्दात मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT