राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात, पण…; फडणवीसांनी सांगितली प्रवेशाची वेळ

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिले. संपर्कात असलेले आमदार कधी भाजपत येणार याबद्दलची योग्य वेळेचा उल्लेखही देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.

देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षांची एक लाईन तयार होताना दिसत नाही. विरोधकांनी काढलेले सगळे मुद्दे शरद पवारांनी खोडून काढले आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करताहेत फडतूस वगैरे शब्द वापरले नाही पाहिजे. चुकीच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही स्वतः सांगितलं की, शरद पवारांच्या आशीर्वादाने आणि त्यांना सांगून ही चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी तुम्ही म्हणाला होता की, अर्धसत्य सांगतोय. आता पूर्ण सत्य सांगून टाका”, असा प्रश्न विचारण्यात आला.

हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित

त्यावर फडणवीस म्हणाले, “वेळ यायची आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. राजकारणात काहीजण सोबत असतात, काही विरोधक असतात. पण, काही मुद्दे तत्वांशी निगडित असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कधी सांगायची याची एक योग्य वेळ असते. एखाद्याशी जमलं नाही, म्हणून त्यांना संकोच वाटेल अशा गोष्टी तुम्ही वेळोवेळी बोलू शकत नाही.”

“राजकीय संबंध वेगळे असतात. वैयक्तिक संबंध वेगळे असतात. रोज समोरासमोर येतो. तरी महाराष्ट्रात दक्षिणेकडील राज्यासारखी परिस्थिती नाही. कट्टर वैर आपल्याकडे नाही. आम्ही एकमेकांविरुद्ध कितीही बोललो तरी एकमेकांसोबत बोलू शकतो. त्यामुळे असं वाटतं की, उरलेलं अर्धसत्य सांगण्याची वेळ येईल. ती वेळ आली की मी निश्चित सांगेन.”

हे वाचलं का?